घरमहाराष्ट्रमतदानाचा ‘टक्का' वाढावा म्हणून अनोखे उपक्रम

मतदानाचा ‘टक्का’ वाढावा म्हणून अनोखे उपक्रम

Subscribe

ठाण्याच्या तुलनेत कल्याण लोकसभा मतदार संघात मतदानाची टक्केवारी कमी आहे. या मतदार संघात पाच ठिकाणी निवडणूक आयोगाचे विशेष पथक दौरा करून मतदानाविषयी आवाहन करणार आहे.

ठाणे जिल्ह्यात गेल्या लोकसभा निवडणुकीत जेमतेम ५० टक्के मतदान झाले होते. मात्र यंदा मतदानाचे प्रमाण किमान ७० टक्क्यांपर्यंत वाढावे, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वीप उपक्रमांतर्गत विविध जनजागृतीपर उपाय योजले जात आहेत. मार्च महिन्यापासून शहरी आणि ग्रामीण भागात चुनाव पाठशालासारखे उपक्रम राबविण्यात आले. आता निवडणूक प्रचार ऐन भरात आलेला असताना शोभायात्रा, मॅरेथॉन, दुचाकी फेरी, सायकल फेरी आदी उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी रेवती गायकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

‘व्होट ठाणे व्होट’ हे या मोहीमेचे घोषवाक्य असून बिबट्या हे बोधचिन्ह आहे. सध्या विविध माध्यमांद्वारे नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे, याचा प्रसार केला जात आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे अनेक लोक गावी जातात. त्याचाही परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होतो. त्यामुळे यंदा ‘मतदान करा आणि मगच गावाला जा’ असे आवाहन केले जात आहे. ठाणे जिल्ह््यात शहरी विभागाच्या तुलनेत ग्रामीण भागात मतदानाचे प्रमाण अधिक आहे. शहापूर आणि मुरबाडमध्ये गेल्या निवडणुकात सरासरी साठ टक्के मतदान झाले होते. शहरी विभागात मात्र निरूत्साह दिसून येतो. शहरी विभागातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी यंदा जिल्ह्यातील २४ हजार निवासी संकुलांच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ९८ रोटरी क्लबद्वारेही मतदानाचा प्रसार केला जात आहे.

- Advertisement -

ठाण्याच्या तुलनेत कल्याण लोकसभा मतदार संघात मतदानाची टक्केवारी कमी आहे. या मतदार संघात पाच ठिकाणी निवडणूक आयोगाचे विशेष पथक दौरा करून मतदानाविषयी आवाहन करणार आहे. जिल्ह्यातील सर्व १८ विधानसभा मतदार संघांमध्ये मतदानाच्या दोन दिवस आधी प्रभात फेऱ्या काढण्यात येणार आहेत. ‘मी मतदान करणार’ अशा प्रकारचे ४० फलकांचा त्यात समावेश असणार आहे. याशिवाय रेल्वे स्थानक, बस स्थानक आणि चौकांमध्ये पथनाट्य सादर केली जाणार आहेत.

दिव्यांग मतदारांसाठी खास बसव्यवस्था

ठाणे जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांसाठी खास बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या मतदारांना त्याविषयी पूर्वकल्पना देण्यात आली असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -