घरमहाराष्ट्रसरस्वतीची प्रतिमा ठेवली म्हणून साहित्यिक यशवंत मनोहरांनी पुरस्कार नाकारला

सरस्वतीची प्रतिमा ठेवली म्हणून साहित्यिक यशवंत मनोहरांनी पुरस्कार नाकारला

Subscribe

साहित्यिक यशवंत मनोहर यांनी पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात सरस्वतीची प्रतिमा ठेवली म्हणून विदर्भ साहित्य संघाचा जीवनव्रती पुरस्कार नाकारला आहे. विदर्भ साहित्य संघातर्फे डॉ. यशवंत मनोहर यांना जीवनव्रती पुरस्कार दिला जाणार होता. मात्र, कार्यक्रमात सरस्वीतीची प्रतिमा ठेवू नये. त्या ऐवजी सावित्रीबाई फुले, फातिमा शेख किंवा ताराबाई शिंदे यांची प्रतिमा ठेवावी, अशी मागणी त्यांनी विदर्भ साहित्य संघाकडे केली होती, पण विदर्भ साहित्य संघाने या मागणीवर काहीच प्रतिक्रिया न दिल्यामुळे त्यांनी हा पुरस्कार नाकारण्याचा निर्णय घेतला.

यशवंत मनोहर यांना विदर्भ साहित्य संघाचा जीवनव्रती पुरस्काराने गौरविण्यात येणार होतं. विदर्भ साहित्य संघाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन आपण पुरस्कार स्वीकारु, असं यशवंत मनोहर यांनी सांगितलं होतं. मात्र, सरस्वतीची प्रतिमा कार्यक्रमस्थळी ठेवण्यात येणार असल्यामुळे पुरस्कार नाकारला. यावर प्रतिक्रिया देताना यशवंत मनोहर म्हणाले, माझी इहवादी भूमिका आणि माझी लेखक म्हणून असेली भूमिका या सगळ्याची कल्पना साहित्य संघाला असेल असं मला वाटलं होतं. तशी माझी समज होती. मी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर काय काय असेल? अशी विचारणा मी आयोजकांना केली. तेव्हा आयोजकांनी सरस्वतीची प्रतिमा व्यासपीठावर असेल, असं सांगितलं. त्याच क्षणाला मी माझी मुल्ये बाजूला सारुन पुरस्कार स्वीकारु शकत नाही, असं सांगितलं. मी हा पुरस्कार नम्रपणे नाकारत असल्याचं आयोजकांना सांगितलं, असं देखील यशवंत मनोहर म्हणाले.

- Advertisement -

सरस्वतीऐवजी सावित्रीबाई फुले, भारतीय राज्यघटनेची प्रतिमा का नाही?

साहित्यिक पुरस्कार समारंभामध्ये सरस्वतीऐवजी सावित्रीबाई फुले किंवा भारतीय राज्यघटनेची प्रतिमा का ठेवत नाही? याशिवाय, वाड:मयीन कार्यक्रमात कुसुमाग्रज, पु. ल. देशपांडे यांच्या प्रतिमा का लावल्या जात नाहीत? असा सवाल यशवंत मनोहर यांनी उपस्थित केला आहे.

विदर्भ साहित्य संघाने स्पष्ट केली भूमिका

विदर्भ साहित्य संघाने यशवंत मनोहर यांच्या भूमिकेवर त्यांची भूमिका मांडली आहे. मनोहर यांनी जरी सरस्वतीच्या प्रतिमेला विरोध केला असला तरी आम्ही आमची परंपरा बदलणार नाही. त्यांनी जशी त्यांची मूल्ये जपली तशीच आम्ही आमची मूल्ये जपू. सरस्वतीला आम्ही सारस्वतांचे प्रतिक मानतो. आम्ही केवळ सरस्वतीच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. आम्ही आमच्या परंपरेनुसार कार्यक्रम पार पाडला, अशी भूमिका विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी स्पष्ट केली.

- Advertisement -

हेही वाचा – राज्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लसीकरणाचा शुभारंभ; पहिल्या दिवशी २८,५०० कोरोनायोद्ध्यांना लस


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -