घरमहाराष्ट्रखडकवासला, पानशेत, वरसगाव ही तिन्ही धरणं १०० टक्के भरली

खडकवासला, पानशेत, वरसगाव ही तिन्ही धरणं १०० टक्के भरली

Subscribe

पुणेकरांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला

पुण्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणारी धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे पुणेकरांच्या पाण्याची चिंता आता मिटली आहे. खडकवासला, पानशेत, वरसगांव ही तिन्ही धरणं शंभर टक्के भरली असून टेमघर ९५ टक्के भरले आहे. त्यामुळे मुठा नदीपात्रात ४५ हजार चारशे ७४ क्युसेस्कसने पाणी साेडण्यात येत आहे.

गेल्या महिन्याभरापासून पुण्यात मुसळधार पाऊस काेसळत आहे. त्यामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणारी सर्व धरणे संपूर्ण भरली आहेत. पुण्याला पाणीपुरवठा करणारी खडकवासला, पानशेत, वरसगाव ही तिन्ही धरणं सध्या १०० टक्क्यांवर असून टेमघर धरणही १०० टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे पुणेकरांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

- Advertisement -

 

दरम्यान, पुण्याला पाणी पुरवठा करणारी धरणं १०० टक्के भरल्याने मुठा नदीपात्रात माेठ्याप्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. परिणामी नदी किनारच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. पुण्यातील शांतीनगर झाेपडपट्टी, पाटील इस्टेट झाेपडपट्टी, त्याचबराेबर ताडीवाला राेड, मंगळवार पेठ येथील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. सिंहगड रस्ता तसेच बाणेर येथील अनेक साेसायट्यांमध्ये देखील पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. त्याचबराेबर मुळा नदीला देखील पूर आल्याने औंध गावातील मुख्य रस्त्यावर पाणी आले आहे. त्यामुळे औंधकडून पिंपरी- चिंचवडकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे.

- Advertisement -

पुण्यातील अनेक पूल देखील वाहतूकीसाठी बंद करण्यात आले आहेत. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशाेर राम यांनी नागरिकांना केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -