Saturday, January 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही - संजय राऊत

शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही – संजय राऊत

Related Story

- Advertisement -

दिल्ली विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पॉलिटीकल किडा या ट्विटर हँडलवर एक आक्षेपार्ह व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. तान्हाजी चित्रपटाच्या ट्रेलर व्हिडिओवर शिवाजी महाराजांच्या जागी नरेंद्र मोदी तर तान्हाजीच्या जागी अमित शहा यांचा चेहरा दाखविण्यात आला आहे. विधानसभेच्या प्रचारासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आला असून भाजपने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र शिवसेनेचे खासदार, ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी मात्र पुन्हा एकदा यानिमित्ताने भाजपवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज हे विश्वाचे युगपुरुष आहेत. आमचा प्राण जाईल, पण आम्ही छत्रपतींचा अपमान सहन करणार नाही. भाजपकडून दुसऱ्यांदा शिवरायांचा अवमान झालेला आहे. महाराष्ट्रात ज्यांना वाटतं की छत्रपतींवर बोलण्याचा अधिकार फक्त त्यांनाच आहे. त्यांनी आता यावर बोलावे. राजकारणासाठी शिवरायांचा वापर होणे योग्य आहे का? याचेही त्यांनी उत्तर द्यावे.”

- Advertisement -