घरमहाराष्ट्रनरेंद्र मोदी रायगड पायी चढणार का?

नरेंद्र मोदी रायगड पायी चढणार का?

Subscribe

खासदार संभाजीराजे यांचे फिटनेस चँलेंज

सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक ट्रेंड होत असलेल्या FitnessChallenge (फिटनेस चँलेज) या मोहिमेत आता खासदार संभाजीराजे भोसले यांनी भाग घेतला आहे. संभाजीराजेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेता अक्षय कुमार, आमीर खान, अजय देवगन आणि इतर अनेक सेलिब्रेटी तसेच राजकारण्यांना एक अवघड चँलेंज दिले आहे. अनेक सेलिब्रेटी पुशअप मारणे, धावणे वगैरे सारखे छोटे-मोठे चॅलेंज आरामात स्वीकारुन त्याचे व्हिडिओ आनंदाने पोस्ट करतात. हे फिटनेस चॅलेंज राजकारण्यांसाठी चांगलेच अडचणीचे ठरणार आहे. त्याला कारणही तसेच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राजधानी किल्ले रायगड पायी चढण्याचे चँलेंज संभाजीराजे यांनी दिले आहे.


माहिती प्रसारण, युवा, क्रीडा खात्यांचा कारभार पाहणारे केंद्रीय मंत्री राजवर्धन राठोड यांनी २२ मे रोजी #HumFitTohIndiaFit या हॅशटॅगने #FitnessChallenge मोहीम सुरु केली. त्यांनी ह्रतिक रोशन, विराट कोहली, सायना नेहवाल यांना आव्हान देत त्यांचे फिटनेस व्हिडिओ किंवा फोटो पोस्ट करण्यास सांगितले. त्यापैकी विराट कोहलीने तर आपला फिटनेस व्हिडिओ पोस्ट करत पुढे चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी, पत्नी अनुष्का शर्मा तसेच एम.एस.धोणी यांना आव्हान दिले.

- Advertisement -


ट्विटरवर खूपच सक्रीय असलेल्या नरेंद्र मोदींनी आपले योगा करतानाचे फोटो पोस्ट करत आव्हानाला तोंड दिले. त्यानंतर ही मोहीम आणि #HumFitTohIndiaFit #FitnessChallenge हे हॅशटॅग चाँगलेच ट्रेंड झाले.

- Advertisement -

दरवर्षी ६ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा राजधानी किल्ले रायगडावर साजरा केला जातो. संभाजी छत्रपती स्वत: त्यासाठी सक्रीय पुढाकार घेतात. संभाजीराजे यांनी राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर पायी चालत जातानाचा स्वत:चा आणि शिवभक्तांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडिओसोबत त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री राजवर्धन राठोड, खासदार किरेण रिजिजू, काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया, अभिनेता आमीर खान, अक्षयकुमार, अजय देवगन, रितेश देशमुख यांनाही टॅग करत पाच जून रोजी दुपारी तीन वाजता माझ्यासोबत किल्ले रायगडावर चला असे आव्हान त्यांनी दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -