घरमहाराष्ट्रकुस्ती हे महाराष्ट्राचे वैभव - बाळासाहेब थोरात

कुस्ती हे महाराष्ट्राचे वैभव – बाळासाहेब थोरात

Subscribe

कुस्तीने तंदुरुस्त शरिराबरोबर मन ही चंचल राहते. संगमनेरमध्ये अशा मोठ्या स्पर्धांचे होणारे आयोजन हे कौतुकास्पद असून कुस्ती हा खेळ महाराष्ट्राचे वैभव असल्याचे गौरवोदगार आ. बाळासाहेब थोरात यांनी काढले.

मैदानी खेळ हे आरोग्याची गुरुकिल्ली आहे. कुस्तीने तंदुरुस्त शरिराबरोबर मन ही चंचल राहते. संगमनेरमध्ये अशा मोठ्या स्पर्धांचे होणारे आयोजन हे कौतुकास्पद असून कुस्ती हा खेळ महाराष्ट्राचे वैभव असल्याचे गौरवोदगार आ. बाळासाहेब थोरात यांनी काढले आहेत. वेल्हाळे येथे हरिबाबा मित्रमंडळाच्या वतीने आयोजित रायस्तरीय कुस्तीस्पर्धेच्या वेळी ते बोलत होते. यावेळी रणजितसिंह देशमुख,निलेश जाजू,बी.आर.चकोर,सोमनाथ सोनवणे,गोरक्ष सोनवणे,सुभाष सांगळे, अ‍ॅड. सुहास आहेर,तलाठी प्रशांत हासे, पीएसआय भासेले,पीएसआय ढोरे,सुहास आहेर,सचिन खेमनर,देवराम गुळवे,दत्तात्रय कोकणे उपस्थित होते.

दंगल चित्रपटामुळे खेळ चर्चेत आला

यावेळी अंतिम कुस्ती सामन्यात गंगावेश तालिमचे माऊली जमधाडे यांनी पहिले बक्षिस पटकविले. राज्यभरातील विविध पैलवानांची हजेरी या कुस्ती स्पर्धेची मोठे आकर्षण ठरले. याप्रसंगी थोरात म्हणाले की,”कुस्तीला अनेक वर्षांची समृध्द परंपरा असून हा मराठमोळा खेळ महाराष्ट्राची शान आहे. खाशाबा जाधव,साक्षी मलिक सारखे नामवंत खेळाडू या कुस्तीने देशाला दिले. आता या खेळाची आंतराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहे. ऑलम्पिकमध्ये कुस्तीत कायम आपले वर्चस्व राहिले आहे. दंगल या चित्रपटाने कुस्ती खेळ आणखी चर्चेत आला आहे. दिवसोंदिवस लोकप्रिय वाढत आहे. ग्रामीण मातीचा हा खेळ मनाला चैतन्य देणारा आहे. युवकांनी व्हॉटसअप किंवा फेसबुकला वेळ देण्यापेक्षा मैदानावर वेळ द्या तो तुमच्यासाठी सदैव फलदायी ठरेल. आगामी काळात या खेळाला मोठे वैभव प्राप्त होणार आहे. कोणत्याही खेळावर प्रामाणिक निष्ठा व जिद्द असेल तर यश नक्की मिळेल. खेळातूनही करिअरच्या अनेक संधी असून युवकांनी त्या शोधाव्यात.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -