घरमुंबईठाणे : मजुरांना घेवून जाणाऱ्या टेम्पोचा अपघात; १ मजुराचा मृत्यू तर २१...

ठाणे : मजुरांना घेवून जाणाऱ्या टेम्पोचा अपघात; १ मजुराचा मृत्यू तर २१ जखमी

Subscribe

ठाण्यात मजुरांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १ मजुराचा जागीच मृत्यू झाला आहे. तर २१ मजूर जखमी झाले आहेत.

ठाण्यातील साकेत पुलावरुन मजुरांना घेवून जाणा-या टेम्पोचा अपघात होवून एका मजुराचा मृत्यू झाला. तर २१ जण जखमी झाले आहेत. आलम शौकत शेख (२८) असे मृत कामगाराचे नाव आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी सकाळी ९ वाजता ही दुर्घटना घडली.

काय आहे नेमके प्रकरण?

रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास झाडांच्या फांद्या तोडणाऱ्या ठेकेदाराचा टेम्पो मजुरांना घेवून जात होता. त्यावेळी ठाण्यातील साकेत पुलावर या टेम्पोचा अपघात होवून टेम्पो पलटी झाला. टेम्पो ताब्यात घेण्यात आल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र चालकाने मद्यपान केले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कसारा घाटात घसरली रेल्वे; चालकाच्या प्रसंंगावधानामुळे टळला भीषण अपघात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -