घरताज्या घडामोडीअनलॉकनंतर कचऱ्याचे प्रमाण १२०० मेट्रिक टनने वाढले

अनलॉकनंतर कचऱ्याचे प्रमाण १२०० मेट्रिक टनने वाढले

Subscribe

मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन नंतर कमी झालेले कचऱ्याचे प्रमाण आता वाढू लागले आहे.

मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन नंतर कमी झालेले कचऱ्याचे प्रमाण आता वाढू लागले आहे. कचऱ्याचे प्रमाण वाढून आता ५२०० मेट्रिक टन पर्यंत पोहोचले आहे. लॉकडाऊनच्यानंतर प्रारंभी ४००० मेट्रिक टन एवढा कचरा निर्माण होत होता.

मुंबईत दरदिवशी लॉक- डाऊनपूर्वी ६३०० मेट्रिक टन एवढा कचरा निर्माण व्हायचा. परंतु, २२ मार्च रोजी लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर हे प्रमाण ३ हजार ७०० ते ४ हजार मेट्रिक टनावर आले होते. परंतु, अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यानंतर हे प्रमाण मागील महिन्यापासून ४ हजार ८०० ते ५ हजार २०० मेट्रिक टन एवढा कचरा निर्माण होऊ लागला असल्याचे महापलिकेच्या घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मुंबईतील या कचऱ्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे वाहून नेणाऱ्या वाहनांच्याही फेऱ्या १० टक्के कमी झाल्या आहेत. सध्या ९० टक्के कचरा गाड्या वापरात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

- Advertisement -

हॉटेल्समधील कचरा गोळा करण्यासाठी आधी रात्रीच्या वेळी वाहने उपलब्ध करून देत त्यातून कचरा गोळा केला जात असे. परंतु, आता हॉटेल्स सेवा बंद झाल्यामुळे रात्रीच्या सेवा बंद करून दिवसा वळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. सध्या हॉटेलमधील कचरा आणि लोकल सुरू नसल्याने नागरिकांडून होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी आहे. मात्र, लोकल रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर हे प्रमाण वाढले जाऊ शकते.

मुंबईत सुरुवातील सुमारे ९ हजार मेट्रीक टन एवढा कचरा दैनंदिन कचरा निर्माण व्हायचा. परंतु, ऑगस्ट २०१८मध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरण आणि खत निर्मिती प्रकल्प आदींचे उपक्रम राबवण्याचे निर्देश देत प्रशासनाने हे प्रमाणे ७ हजार २०० मेट्रीक टनावर आणले. परंतु, आता हेही कचऱ्याचे प्रमाण आता मुंबई महापालिकेने ६ हजार ४३० मेट्रीक टनावर आणले आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांमध्ये हे प्रमाण ६०० मेट्रीक टनाएवढे कमी आणल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला होता. त्यातच लॉकडाऊननंतर हे कचऱ्याचे प्रमाण अधिकच कमी झाले होते.

- Advertisement -

हेही वाचा – Corona In Maharashtra: राज्यात २३,४४६ नव्या रुग्णांची नोंद; ४४८ बाधितांचा मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -