घरमुंबई५५ शस्त्रक्रिया करुन 'त्याने' घेतला मोकळा श्वास

५५ शस्त्रक्रिया करुन ‘त्याने’ घेतला मोकळा श्वास

Subscribe

अमोल भवरीवर वयाच्या तिसऱ्या वर्षापासून आतापर्यंत त्याच्यावर ५५ शस्त्रक्रिया केल्या गेल्या आहेत. नुकतीच अमोलवर ५५ वी शस्त्रक्रिया कोहिनूर हॉस्पिटलमध्ये पार पडली.

वयाच्या तीसऱ्या वर्षापासून श्वासाचा त्रास असलेल्या मुलावर आतापर्यंत तब्बल ५५ शस्त्रक्रिया केल्यानंतर अखेर त्याने मोकळा श्वास घेतला. हा मुलगा पुण्यात राहणारा असून त्याला रिकरंट रेस्पिरेटरी पॅपिलोमेटोसिस (RRP) ही श्वसनमार्गातील दुर्मिळ समस्या होती. ज्यामुळे त्याला नीट श्वास घेता येत नव्हतं आणि बोलताही येत नव्हतं.

अखेर त्याची प्रकृती ठिक झाली

या आजारात श्वसनलिकेत चामखीळासारखा (पॅपिलोमास) प्रकार येतो. तो काढण्यासाठी तो दर चार महिन्यांनी शस्त्रक्रिया करुन घेत होता. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून आतापर्यंत त्याच्यावर ५५ शस्त्रक्रिया केल्या गेल्या आहेत. नुकतीच अमोलवर ५५ वी शस्त्रक्रिया कोहिनूर हॉस्पिटलमध्ये पार पडली. त्यामुळे आता अमोलची प्रकृती ठिक असून तो एक सामान्य आयुष्य जगत आहे.

- Advertisement -

काय आहे रिकरंट रेस्पिरेटरी पॅपिलोमेटॉसिस ?

हा एक दुर्मीळ प्रकारचा श्वसनलिकेचा विकार आहे. यात श्वसनलिकेत चामखीळासारख्या प्रकाराची वाढ होते. यांना पॅपिलोमास असे म्हणतात. ते अघातक ट्युमर असतात. त्यांची सुरुवात नाक आणि तोंडापासून होते आणि ते फुफ्फुसापर्यंत असतात. हे ट्युमर श्वसनलिकेत कुठेही होऊ शकतात, पण सामान्यपणे त्यांची वाढ स्वरयंत्रात होते. याला लॅरिन्गिअल पॅपिलोमेटॉसिस असं म्हणतात. पॅपिलोमास वेगवेगळ्या आकाराचे असतात आणि ते पटकन वाढतात. ते काढल्यावर त्यांची वाढ पुन्हा होते. ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही)/ हवेवाटे होणारा संसर्ग/ मातेला जेनिटल पॅपिलोमा असेल/ धुळ श्वासावाटे नाकात जाणे या कारणांमुळे हा आजार होतो. अमोलचा आवाज घोगरा होता, श्वास घेणे आणि बोलणे कठीण जात होते आणि त्याला खोकलाही झाला होता.

अमोल भवरी म्हणाला, “ मी ३ वर्षांचा असताना मला हा आजार असल्याचं निदान झालं. यामुळे मला अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. नीट संवाद साधणं हे आयुष्यातील खूप महत्त्वाचं कौशल्य असतं. पण, मला श्वास घेणं आणि बोलणंही अशक्य होतं. शाळा कॉलेजमधील प्रत्येक जण मला विचारायचा की मी नीट बोलू का शकत नाही, पण, या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. या समस्येमुळे मी फक्त शारीरिकरित्या नाही तर भावनिक आणि मानसिकरित्या देखील खचलो होतो. ”

५५ वी शस्त्रक्रिया करुन कायमचा उपाय केला

ट्रेकियोस्टोमी (tracheostomy – गळ्यावर छिद्र पाडून श्वसनमार्गात केलेली शस्त्रक्रिया) करून तात्पुरता हा पॅपिलोमास काढून अमोलला श्वास घेण्यासाठी मार्ग मोकळा केला जात होता. पण, काही कालावधीनंतर हा पॅपिलोमास पुन्हा यायचा. यामुळे, अमोलवर दर ४ महिन्यांनी शस्त्रक्रिया करावी लागायची. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून त्याच्यावर आतापर्यंत पुण्यातील रुग्णालयात अशा ५५ शस्त्रक्रिया झाल्या आणि नुकतीच त्याच्या ५५ वी शस्त्रक्रिया करुन त्याच्या या आजारावर कायमचा उपाय करण्यात आला.

- Advertisement -

हेही वाचा – 

स्टेपलरने जोडलेल्या अंगठ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -