घरमुंबईआक्षेपार्ह व्हिडिओमुळे एजाज खानला अटक

आक्षेपार्ह व्हिडिओमुळे एजाज खानला अटक

Subscribe

बिग बॉस फेम अभिनेता एजाज खान पुन्हा एकदा वादात

बिग बॉस फेम अभिनेता एजाज खान पुन्हा एकदा वादात सापडला आहे. आक्षेपार्ह व्यक्तव्यामुळे एजाज खान नेहमीच चर्चेत असतो. टीक टॉकवरील एका वादग्रस्त व्हिडिओमुळे तसेच झारखंड येथील हिंसाचारानंतर टिक टॉकवर हिंदू-मुस्लिम धर्मात तेढ निर्माण करणारा व्हिडिओ वायरल केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली आहे. तसेच मुंबई पोलिसांची खिल्ली उडविल्याचा आरोप देखील एजाजवर करण्यात आला आहे.

- Advertisement -

एजाज खानचा हा व्हिडिओ समाजात तेढ निर्माण करणारा आहे म्हणूनच त्याला अटक करण्यात आली आहे. या टीक-टॉक व्हिडिओच्य़ा माध्यमातून एजाजने विशिष्ट समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य देखील केले असून मुंबई पोलिसांवर त्याने टीका केली होती.

- Advertisement -

दरम्यान, गुरूवारी मुंबई पोलिसांनी कारवाई करत एजाज खानला अटक केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -