घरमुंबईभुजबळांचा मुक्काम पुन्हा 'रामटेक'मध्येच

भुजबळांचा मुक्काम पुन्हा ‘रामटेक’मध्येच

Subscribe

विशेष म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मलबार हिल येथील सागर या शासकीय बंगल्याचे वाटप करण्यात आले आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर कोणत्या नेत्याला कोणता बंगला मिळणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. अखेर उद्धव ठाकरे यांच्या सोबत शपथ घेतलेल्या नेत्यांपैकी एकनाथ शिंदे, जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांना सामान्य प्रशासन विभागाने बंगल्याचे वाटप केले असून, त्यानुसार मंत्री छगन भुजबळ यांचा मुक्काम पुन्हा एकदा ‘रामटेक’मध्येच असणार आहे. भुजबळ हे आघाडीच्या काळात मंत्री असताना ‘रामटेक’ येथेच वास्तव्यास होते. छगन भुजबळ यांच्या प्रमाणेच अन्य मंत्र्यांनाही बंगल्याचे वाटप करण्यात आले आहे. विशेष म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मलबार हिल येथील सागर या शासकीय बंगल्याचे वाटप करण्यात आले आहे.

कोणत्या नेत्याला? कोणता बंगला?

सामान्य प्रशासन विभागातर्फे आज नव्या मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप करण्यात आले. त्यानुसार नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ‘वर्षा’ बंगल्याचा ताबा घ्यावा लागणार आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांना ‘सेवा सदन’, शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना ‘रॉयल स्टोन’ या बंगल्याचे वाटप करण्यात आले आहे. जयंत पाटील यांना वाटप झालेल्या ‘सेवासदन’ मध्ये यापूर्वीच्या सरकारात विनोद तावडे यांचे वास्तव्य होते. तर पंकजा मुंडे यांना वाटप करण्यात आलेल्या ‘रॉयल स्टोन’ बंगल्यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे राहणार आहेत. तर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मलबार हिल येथील ‘सागर’ हा शासकीय बंगला देण्यात आला आहे.

- Advertisement -

छगन भुजबळांच्या ‘रामटेक’ विषयी

मलबार हिल परिसरातील नारायणराव दाभोळकर मार्गावरील ‘रामटेक’ या शासकीय बंगल्याचे सगळ्यांना आकर्षण असते. नवे सरकार मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानापेक्षा समुद्रकिनारी असलेला ‘रामटेक’ बंगला नेहमीच उजवा ठरतो आहे. मात्र या बंगल्याचा इतिहास पाहिला तर बरेच नेते नको रे बाबा रामटेक असेच म्हणतात. आघाडीच्या काळात छगन भुजबळ हे ‘रामटेक’मध्येच राहत होते. मात्र गेल्या काही वर्षात ‘रामटेक’ बंगल्यात राहणाऱ्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. यामध्ये एकनाथ खडसे, खुद्द छगन भुजबळ, माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत नेते विलासराव देशमुख या दिग्गज नेत्यांचा समावेश होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा रामटेक बंगला मिळालेल्या भुजबळांना हा बंगला मानवेल का? हे पहावं लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -