हेलो ठरले अव्वल

Mumbai

इंडस एपबझारने ६० लाख वापरकर्त्यांमधील सर्वात लोकप्रिय असलेल्या एप्सची यादी जाहीर केली आहे. ग्राहकांमध्ये तुलनेने वापरायला सोपी असणारी हेलो, शेअरचॅट आणि लाइकीसारखी एप्स स्मार्टफोनधारकांना सर्वाधिक पसंत असल्याचे दिसून येत आहे.

जगभरातील ५० लाख मोबाइलधारक वापरत असलेल्या हेलो एपचा वापर अमेरिका, कॅनडा, सिंगापूर, मलेशिया, सौदी अरेबिया, यूएई, ओमान, कुवेत, कतार, नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेश या देशांमध्ये १४ विविध भाषांमध्ये केला जातो. संपूर्ण भारतीय बनावटीच्या या एपमध्ये चॅटिंग, व्हिडिओ शेअरिंगसारख्या सुविधा आहेत.२०१९ या एका वर्षांत शेअरचॅट एपवरून तब्बल दहा कोटी हिंदी भाषेतला यूजर जनरेटेड कंटेंट अर्थात वापरकर्त्यांनी तयार केलेले व्हिडियो, फोटो शेअर करण्यात आलेत. यावरूनच या एपची तुफान लोकप्रियता लक्षात येते.

क्सेंडरसारख्या एप्सनाही मोबाइलधारक मोठ्या प्रमाणात पसंती देतात. या एपवरून वेगवेगळ्या आकाराच्या आणि प्रकारच्या फाइल्स इंटरनेट व वायफाय विना एका मोबाइलवरून दुसर्‍या मोबाइलवर पाठवता येतात. क्युरेकासारखे कोडी घालणारे एप असो, अथवा लहानपणी जमिनीवर बसून खेळलेला ल्यूडो या खेळाचे मोबाइल व्हर्जन असो, या गेम्सना मोबाइलधारकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले आहे.

क्लिअरट्रिप या ऑनलाइन विमानाची तिकीटे, हॉटेल बुकिंग, सुट्ट्यांची पॅकेजेस विकणार्‍या एपने गेल्या एका वर्षात जगभरात १.५ अब्ज अमेरिकी डॉलर्सचा व्यवसाय केला आहे. टाटा क्लिक, ओव्हन स्टोरी, एमपॉकेट, ओपेरा न्यूज आणि ट्रू कॉलर या अ‍ॅप्सनाही नेटकर्‍यांनी जोरदार पसंती दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here