जरा जपून! फटाक्यांमुळे पशू-पक्षी होतायत जखमी

पशु-पक्ष्यांची आवाज ऐकण्याची क्षमता माणसापेक्षा सात पटींनी अधिक असते. त्यामुळे फटाकांच्या आवाजाने पक्ष्यांच्या कानाच्या नसा तुटण्याची देखील शक्यता असते

Mumbai
Be aware! Birds and animals getting injured due to Diwali firecrackers
प्रातिनिधिक फोटो

दिवाळीच्या दिवसांत फटाक्यांच्या धूराचा आणि आवाजाचा त्रास  माणसांइतकाच किंबहुना जास्त मुक्या प्राण्यांनाही होत असतो. आपल्या आजूबाजूला वावरणारे पशु-पक्षी फटाक्यांमुळे जखमीसुद्धा होतात. वारंवार जनजागृती केल्यानंतरही दरवर्षी मोठ्या प्रमाणात पशू-पक्षी गंभीर जखमी होण्याच्या घटना घडतात. यंदाच्या वर्षीही दिवाळी सुरू झाल्यापासून आतापर्यंत परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात वेगवेगळ्या जातीचे जखमी पक्षी आणि प्राणी दाखल झाले आहेत. मात्र, यातली एक चांगली बाब म्हणजे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा भरती झालेल्या जखमी जनावरांच्या संख्येत २५ टक्क्यांनी घट झाली आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवसांपासून ते आतापर्यंत जवळपास १५ ते २० जखमी झालेले पक्षी, ६ कुत्री तसंच ४ ते ५ मांजरी दाखल झाल्या आहेत. जखमी पक्षांमध्ये कबूतर, घार, घुबड, कोकिळा, पोपट आणि चिमणी या पक्षांचा समावेश आहे. फटाक्यांच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळे पशु-पक्षी नवा आसरा शोधत असतात. यादरम्यान त्यांच्या मनात भीती दाटून येते आणि कधी कधी अतिताणामुळे त्यांचा हृदयविकाराने मृत्यू होतो.

दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे जखमी झालेले पशू-पक्षी रुग्णालयात वेगवेगळे दाखल होतात. यावर्षी मात्र त्यांच्या संख्या २५ टक्क्यांनी घटली आहे. यावर्षी २० ते २५ पशू-पक्ष्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात आणलं गेलं. काही प्राणी मित्रांमुळे हे पक्षी रुग्णालयात दाखल होतात. तर, काही पशू-पक्षी आम्ही रुग्णालयात दाखल करतो. फटाक्यांमुळे या पशू-पक्ष्यांना भाजले जातात तसंच श्वास घ्यायला अडचण होते. आम्ही त्यांच्यावर तात्काळ उपचार करुन पुन्हा बाहेर सोडतो. – परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयाचे सचिव डॉ. जे. सी. खन्ना

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पशु-पक्ष्यांची ध्वनी ऐकण्याची क्षमता मानवजातीपेक्षा सात पटींनी अधिक असते. त्यामुळे फटाकांच्या आवाजाने पक्ष्यांच्या कानाच्या नसा तुटण्याची देखील शक्यता असते. फटाक्यांच्या आवाजामुळे पशु-पक्षी कायमस्वरुपी बहिरे होण्याची देखील भीती असते. याशिवाय ते दगावण्याचीही शक्यता असते. त्यामुळे याविषयी सतत जनजागृती केली जाते.


वाचा: नालासोपाऱ्यामध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here