घरमुंबईमुंबई एटीएसच्या कारवाईत वैभव राऊतनंतर आणखी दोघांना अटक

मुंबई एटीएसच्या कारवाईत वैभव राऊतनंतर आणखी दोघांना अटक

Subscribe

नालासोपारा येथील सोपारा गावात राहणाऱ्या वैभव राऊत याच्या घरावर आणि दुकानावर मुंबई एटीएसने रात्री छापा टाकला. या कारवाईत वीस देशी बॉम्ब हस्तगत करण्यात आले आहेत.

नालासोपारा येथे गुरुवारी मध्य रात्री एटीएसने कारवाई करत वीस देशी बॉम्ब हस्तगत केले आहे. नालासोपारामधील सोपारा गावात राहणाऱ्या वैभव राऊत याच्या घरावर आणि दुकानावर मुंबई एटीएसने रात्री छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या घरातून आणि दुकानातून काही संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

आणखी दोघांना अटक 

नालासोपारा बॉम्ब प्रकरणी एटीएसने आतापर्यंत तीन जणांना अटक केली असून नालासोपाऱ्यातील २५ वर्षीय शरद कळसकर आणि पुण्यातील ३९ वर्षीय सुधनवा गोंधळेकर यांना ताब्यात घेतले आहे. वैभव राऊत याच्याकडून २० देशी बॉम्ब जप्त करण्यात आला असून यामध्ये नालासोपारा येथील घरातून ८ आणि दुकानासून १२ बॉम्ब हस्तगत करण्यात आले आहे. नालासोपारामधून ताब्यात घेण्यात आलेल्या वैभव राऊत आणि इतर गोष्टीबद्दल एटीएसकडून खुलासा करण्यात आला असून तिनही आरोपींसह मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य साठा पोलीसांनी जप्त केला आहे. या तिघांना १८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

जप्त केलेले साहित्य 

  • जिलेटिनच्या काड्या २
  • इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर्स ४
  • नॉन इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर्स २२
  • सुरक्षा फ्यूजच्या तारा
  • न्यूज पेपरमध्ये गुंडाळलेले व्हाईट पाउडर स्टिक
  • प्रत्येकी एक लिटरची विषाने भरलेली बाटली २
  • ६ वोल्ट क्षमतेच्या १० बॅटरी असलेला बॉक्स १
  • कटर आणि ब्लेड्स
  • खांद्यावरील यंत्र आणि उपकरणे
  • स्विचेस ३
  • विशिष्ट प्रकारचे सर्किट्स (१ पूर्ण २ अपूर्ण) ३
  • बॅटरी कनेक्टर्स
  • बॅटरी कन्टेनर्स २
- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -