घरमुंबईमहिला शेतकऱ्याची जमीन हडपण्याचा 'तिचा' प्रयत्न उघड

महिला शेतकऱ्याची जमीन हडपण्याचा ‘तिचा’ प्रयत्न उघड

Subscribe

देवा ग्रुप फाऊंडेशन सामाजिक संस्थेचा वेळप्रसंगी अन्यायाविरोधात लढण्यासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा.

भिवंडी तालुक्यातील भावाळे, वाकीपाडा येथील महिला शेतकऱ्याच्या जमिनीत मुंबईतील एका बड्या गोडाऊन विकासक महिलेने अतिक्रमण करून जमीन हडप करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली समोर आली आहे. या प्रकरणी सदर महिलेच्या विरोधात पडघा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सुशीला लखमजी गाला रा. नरिमन हाऊस, मुंबई असे तक्रार दाखल झालेल्या गोडाऊन विकासक महिलेचे नांव आहे. या विकासक महिलेने स्थानिक शेतकरी महिला ताराबाई किसन ढोले यांच्या भावाळे येथील सर्व्हे नं. ४६/ ३ क्षेत्र ४२ गुंठे या जागेत अतिक्रमण करून जमीन हडपण्याचा प्रयत्न केला आहे.

जमिनीवर अतिक्रमण

सदरची जमीन श्रीमती ढोले यांनी त्यांच्याच गावातील शेतकरी बाळाराम सुकऱ्या रंधवी यांच्याकडून सन २००७ मध्ये विकत घेतली होती. सदर जमीन त्यांच्या नांवे असून ७ /१२ उताऱ्यावर तशी नोंदही आहे. या जमिनीची सरकारी मोजणी करून त्यानूसार चतुरसीमा कायम केलेल्या आहेत. असे असताना गोडाऊन विकासक सुशीला गाला यांनी श्रीमंतीचा थाट वापरून बळजबरीने जमिनीवर अतिक्रमण करून जमिनीवर असलेले तारेचे कुंपण तोडून नुकसान केले आहे. त्यामुळे वारंवार होणाऱ्या अतिक्रमणामुळे महिला शेतकरी ताराबाई ढोले ह्या त्रस्त झाल्या असून त्यांनी सुशीला गाला यांच्याविरोधात पडघा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रारीनूसार भादंवि. १८६० अन्वये कलम ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

आंदोलनाचा इशारा

मौजे भावाळे, वाकीपाडा येथील स्थानिक महिला शेतकरी ताराबाई किसन ढोले यांना गोडाऊन विकासक महिला सुशीला गाला आणि त्यांचा व्यवस्थापक मिश्रा हे दोघे विनाकारण त्रास देऊन त्यांची जमीन हडपण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याबाबत पीडित शेतकरी महिला ताराबाई ढोले यांनी देवा ग्रुप फाउंडेशनकडे लेखी विनंती करुन मदतीचा हात मागितला आहे. त्यामुळे महिला शेतकरी ढोले यांना देवा ग्रुप फाउंडेशनच्या माध्यमातून सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण करण्यासाठी सहकार्य करून न्याय मिळवून देऊ. वेळप्रसंगी अन्यायाविरोधात लढण्यासाठी आम्हीं रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असे देवा ग्रुप फाऊंडेशन सामाजिक संस्थेचे संस्थापक ,सचिव तानाजी मोरे यांनी सांगितले.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -