दोन आठवड्यात १०७ फाईल्स क्लिअर; एसआरएकडून मान्सूनपूर्व कामाला वेग

लॉकडाऊनमुळे अनेक कार्यालयीन कामांवर परिणाम झालेला असताना एसआरएने अतिशय विक्रमी वेळेत ही मंजुरी दिली आहे.

Mumbai

मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने रेकॉर्ड ब्रेकिंग अशा विक्रमी वेळेत १०७ फाईल्सला मान्सूनपूर्व कामासाठी परवानगी दिली आहे. अवघ्या दोन आठवड्यांमध्येच या कामाची मंजुरी अतिशय जलदगतीने देण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात इतक्या जलदगतीने एखाद्या कामासाठी मंजुरी मिळणे याला अतिशय महत्व आहे. लॉकडाऊनमुळे अनेक कार्यालयीन कामांवर परिणाम झालेला असताना एसआरएने अतिशय विक्रमी वेळेत ही मंजुरी दिली आहे.

मान्सून काळात झोपडीवासीयांची कोणतीही गैरसोय होऊ नये तसेच कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठीच एसआरएमार्फत ही विक्रमी वेळेत परवानगी देण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे एसआरएने झोपडीवासीयांच्या कोणत्याही मंजुऱ्या प्रलंबित ठेवलेल्या नाहीत. एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपुर यांनीच केलेल्या ट्विटमध्ये ही बाब नमुद केली आहे. अतिशय सावधानतापूर्वक आणि सर्व सुरक्षितता बाळगत ही कामे सुरू असल्याचे त्यांनी नमुद केले आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एसआरएने एक परिपत्रक जारी करत मान्सूनपूर्व कामांसाठी योग्य खबरदारी घेत कामे करण्यासाठी परवानगी दिली होती. त्यामध्ये कोविड- १९ च्या अनुषंगाने खबरदारी घेत ही कामे करायची आहेत असे परिपत्रकात नमुद करण्यात आले होते.

एसआरए अंतर्गत विकासकांना झोपड्यांच्या जागेवर इमारती बांधण्यासाठी परवानगी देण्यात येते. झोपडीवासीयांना चांगल्या राहणीमानाची सुविधा देण्यासाठी अशा प्रकल्पांसाठी पुढाकार घेण्यात येत आहे. मान्सूनच्या कालावधीत कोणत्याही अप्रिय घटनेला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये म्हणूनच एसआरएमार्फत या परवानग्या देण्यात आल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here