राज्यातील सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे सक्तीचे – मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांनी सीबीएसई, आयसीएसई, एसएससी बोर्डाच्या शाळेत मराठी भाषा शिकवण्यासाठी कडक कायदा करणार असल्याचे स्पष्ट केले.

Mumbai
CM Devendra fadanvis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील एसएससी, आयसीएससी आणि सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे सक्तीचे असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये केली आहे. राज्यात इंग्रजी आणि इतर माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा कायदा सक्तीचा करण्याबाबतचा तारांकित प्रश्न डॉ नीलम गोऱ्हे यांनी औचित्याचा मुद्दा विधानपरिषदेमध्ये मांडला होता. काही साहित्यिक मराठी भाषा शिकवली जावी म्हणून येत्या २४ जूनला आझाद मैदान येथे आंदोलन करणार असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.

त्यावर उत्तर देत असताना मुख्यमंत्र्यांनी सीबीएसई, आयसीएसई, एसएससी बोर्डाच्या शाळेत मराठी भाषा शिकवण्यासाठी कडक कायदा करणार असल्याचे स्पष्ट केले. कोणताही बोर्ड असला तरीही मराठी शिकवावीच लागेल. ज्या शाळा नियमांचे पालन करणार नाहीत त्याची योग्य ती दखल घेण्यात येईल. त्यासाठी कायद्यात बदल करणार असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, मराठी भाषेसाठी, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि साहित्याबाबतच्या विविध मागण्यांसाठी येत्या २४ जूनला येणाऱ्या शिष्टमंडळाची भेट घेऊन त्यांच्या मागण्या जाणून त्यावर योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here