सातवा वेतनासाठी एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ कर्मचारी आक्रमक

सातवा वेतनासाठी एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठातील कर्मचारी आक्रमक झाले असून लवकरात लवकर त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास एकदिवसीय लाक्षणिक संप करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

Mumbai
College teachers stage protest over seventh pay commission
एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ कर्मचारी आक्रमक

अकृषी विद्यापीठ आणि अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या सुधारीत संरचना लागू करणे, सेवांतर्गत आशवासित प्रगती योजनेबाबत रद्द करण्यात आलेले शासन निर्णय पूर्ववत लागू करावे आणि अन्य २५ मागण्यांसाठी महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघातर्फे महाराष्ट्र शासनाला निवेदन देण्यात आले होते. दरम्यान, महाराष्ट्र शासनाकडून यावर कोणताही निर्णय न आल्याने एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारती समोर निदर्शने सुरु केली आहेत.

बेमुदत संप पुकारणार

गेल्या तीन दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठातील कर्मचारी निदर्शने करत आहेत. मात्र, अद्याप या मागण्या पूर्ण झाल्या नसल्याने आज पुन्हा एकदा काळ्या फिती लावून विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारती समोर निदर्शने केली आहेत. दरम्यान, महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाने दिलेल्या निवेदनाला अनुसरुन येत्या २५ जूनला उच्च शिक्षण संचालनालय पुणे कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. २९ जूनला एकदिवसीय लाक्षणिक संप करण्यात येणार. त्याचप्रमाणे जुलैमध्ये कोणत्याही दिवसापासून बेमुदत संप पुकारण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगाच्या सुधारीत संरचना लागू करणे आणि सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनासंदभार्तील मागणीसाठी महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत सर्व कुलगुरुंना निवेदन देखील सादर करण्यात आले आहे.


हेही वाचा – सातवा वेतनासाठी विद्यापीठ कर्मचारी आक्रमक