घरमुंबईकाँग्रेसची जाहीरनामा समिती घोषित

काँग्रेसची जाहीरनामा समिती घोषित

Subscribe

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई काँग्रेसने आतापासून रणशिंग फुंकले असून मुलाखती पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी मुंबई काँग्रेसने निवडणुकीसाठीच्या विविध समिती जाहीर केल्या आहेत. यात प्रामुख्याने जाहिरनाम्यासाठी एकूण २५ जणांची समिती जाहीर केली असून माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांच्या खांद्यावर या जाहिरनामा समितीची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी या समितींची घोषणा केली आहे.

विशेष म्हणजे, गुरुवारी जाहीर केलेल्या विविध समित्यांमध्ये माजी अध्यक्ष संजय निरुपम यांना स्थान देण्यात आलेले नसून लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमध्ये सामील झालेल्या अभिनेत्री उर्मिला मांतोडकर यांच्यावर जाहिरनाम्याच्या समितीच्या सहसंचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या समितीसह इतर दोन समिती देखील जाहीर केल्या आहेत.

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारावा लागल्यानंतर मुंबई काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी विविध विभागांच्या मुलाखती पूर्ण झाल्यानंतर आता मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा आणि कार्याध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मुंबईत विशेष बैठक पार पडल्याची माहिती पुढे आली आहे. या बैठकीत देवरा यांच्याकडे निवडणुकीच्या दृष्टीकोनातून तीन समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीत महत्वपूर्ण अशा जाहीरनामा समिती, मीडिया-सोशल मीडिया आणि प्रसिद्धी समिती बरोबरच राजशिष्टाचार समितीची गठित करण्यात आली आहे.

ज्यात प्रामुख्याने जाहीरनामा समितीचे अध्यक्षपद काँग्रेसचे माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्याकडे सोपविण्यात आलेले आहे. एकूण २५ जणांच्या या समितीत उर्मिला मातोंडकर यांची सहसंचालक पदी निवड करण्यात आली आहे. मातोंडकर यांच्यासह महापालिकेतील गटनेते रवी राजा, भास्कर शेट्टी, विरेंद्र बक्षी, उमाशंकर ओझा, सुरेश कोपकर यांचा समावेश आहे. तर प्रसिद्धीसाठी नेमण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष पद चरण सिंग सप्रा यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -