CoronaVirus: मुंबईत करोनाचे एकूण पाच मृत्यू, ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू

Mumbai
corona patients

मुंबई करोनामुळे आतापर्यंत पाच मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या ६५ वर्षीय महिलेचा कोव्हिड १९ चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. या महिलेला श्वसनास त्रास होत असल्यामुळे तिला २३ मार्चला कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. शिवाय, या महिलेला उच्चरक्तदाब आणि मधुमेहाचा दिर्घकालीन आजार होता. त्यानंतर या महिलेला श्वसनाचा त्रास झाल्यामुळे तिचा गुरुवारी संध्याकाळी मृत्यू झाला आहे. त्यानुसार, गुरुवारी दिवसभरात एकूण दोन मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.

यापूर्वी गोवंडी येथील मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असणारी एक ६५ वर्षीय महिला टंडन हॉस्पिटल, डी वाय पाटील हॉस्पिटल अशा दोन रुग्णालयांकडून संदर्भित होऊन वाशी येथील जनरल हॉस्पिटल येथे अत्यंत गंभीर अवस्थेत दिनांक २४ मार्च रोजी दुपारी भरती झाली. तिचा त्याच दिवशी रात्री मृत्यू झाला. ती करोना बाधित असल्याचे प्रयोगशाळा अहवालावरुन काल स्पष्ट झाले. त्यानंतर यामुळे, राज्यात करोनामुळे झालेल्या मृतांची संख्या पाचवर पोहोचली आहे. सध्या राज्यात करोनाचे १२५ रुग्ण आहेत. तर, मुंबईसह उपनगरांमध्ये १५ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद केली गेली आहे. आतापर्यंत मुंबईतून १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

करोनाचा प्रादूर्भाव रोखता यावा यासाठी संपूर्ण भारतात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यातही आतापर्यंत महाराष्ट्रात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अधिक आहे. राज्यात आतापर्यंत १२५ रुग्ण आढळले आहेत. त्यानुसार, गुरुवारी मुंबईत दोन करोना बाधित महिलांचा मृत्यू नोंदवण्यात आला आहे. तर, आतापर्यंत एकूण ५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here