घरमुंबईCSMT bridge Collapse: १८ जणांवर उपचार सुरू; एकाची प्रकृती गंभीर

CSMT bridge Collapse: १८ जणांवर उपचार सुरू; एकाची प्रकृती गंभीर

Subscribe

सिमेंट ढिग डोक्यावर आदळल्याने काहींच्या डोक्याला जबर दुखापत झाली आहे. तर काहींच्या चेहऱ्याचा जबडा, हात-पाय, मणका आणि कंबरेखाली गंभीर दुखापत झाली आहे.

सीएसएमटी जवळील हिमालय पूल दुर्घटनेमध्ये जखमींवर राज्य सरकारच्या जीटी, सेंट जॉर्ज, जेजे रुग्णालयात उपचारार्थ दाखल आहेत. सुरुवातीच्या उपचारानंतर काही नातेवाईकांनी जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले. शुक्रवारी सायंकाळपर्यंत जखमींपैकी सरकारी रुग्णालयातील सेंट जॉर्ज रुग्णालयात ११, जीटी रुग्णालयात १०, सर जे जे रुग्णालयात १ तर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये एका जखमीवर उपचार सुरु असल्याची माहिती देण्यात आली.

अनेकांना गंभीर दुखापत

सिमेंट शिटसह उंचावरुन खाली आल्याने यातील बहुतांश जण कंबरेवर आदळले आहेत. शिवाय सिमेंट ढिग त्याच वेगात येवून डोक्यावर आदळल्याने काहींच्या डोक्याला जबर दुखापत झाली आहे. तसेच चेहऱ्याचा जबडा, हात-पाय, मणका आणि कंबरेखाली भागाला जबरी फॅक्चरच्या तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

सर्व जखमींची प्रकृती स्थिर

या घटनेनंतर गुरुवारी रात्री गोकुळदास तेजपाल रुग्णालयात १४ जणांना दाखल करण्यात आले असल्याचे गोकुळदास तेजपाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. मुकुंद तायडे यांनी सांगितले. तर शुक्रवारी सायंकाळपर्यंत सात रुग्ण उपचार घेत होते. यातील तिघांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. तर तीन रुग्णांना जसलोक रुग्णालयात नातेवाईकांनी दाखल केले. तसेच दोघांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. एकाला डोक्याला जबरी दुखापत असल्याने काल रात्रीच जे. जे. रुग्णालयात दाखल केले. सध्या सात जखमी उपचार घेत असून एक जण अतिदक्षता विभागात आहे. मात्र, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. तायडे यांनी सांगितले.

रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याची गरज

तर, दुर्घटनेतील एकूण १७ जखमींना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केले होते. यातील तीन मृत घोषित केले. दाखल जखमींपैकी एकाला डोक्याला दुखापत असल्याने न्युरो सर्जरीसाठी रात्री जे. जे रुग्णालयात पाठवण्यात आले. शुक्रवारी चार जणांवर शस्त्रक्रिया झाली. अजून तिघांवर शस्त्रक्रियेची गरज आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत ११ जण दाखल असून डोक्याला जबर मार, कंबर, हात, पायाला फ्रॅक्चर आहे. यातील एक जण आयसीयूमध्ये असून तो निरीक्षणाखाली आहे. सर्वाची प्रकृती स्थिर असल्याचे सेंट जॉर्ज रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर गायकवाड यांनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -