घरमुंबईUpdate: मध्य रेल्वेला खोळंबा; मुंबई-नाशिक वाहतूक ठप्प

Update: मध्य रेल्वेला खोळंबा; मुंबई-नाशिक वाहतूक ठप्प

Subscribe

कोणतीही जीवितहानी झालेली नाही

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस १२५९८ गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेसचा एक डबा कसारा ते इगतपुरी दरम्यान घसरल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेत कुणीही जखमी झाले नसून या एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणारे सर्व प्रवासी सुखरुप आहेत.

अपघातग्रस्त गोरखपूर एक्स्प्रेस रवाना

या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाच्या आपत्कालीन विभागाने मदतकार्य सुरू केले होते. पहाटेच्या वेळी ही घटना घडली असल्याने एक्सप्रेसचा घसरलेला डबा हटवण्याचे काम सुरू होते. मात्र तब्बल ९ तासांच्या कामानंतर गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेसचा घसरलेला डबा हटवण्याचे काम पूर्ण झाले असून, साधारण साडेनऊच्या सुमारास एक्स्प्रेस पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली आहे.

- Advertisement -

अशी घडली घटना

आज पहाटे मुंबई वरून गोरखपूरला जाणारी हमसफर एक्सप्रेस कसारा सोडल्यानंतर घाटात असलेल्या ब्रिटिशकालीन भीमा-२ पुलावर पहाटे ३:५० वाजता वळणावर जात असताना पाठीमागून इंजिनपासून दुसरा डबा रुळावरून घसरत आल्याने पुलावर मोठा आवाज झाला. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने गाडी थांबवली यामुळे मोठी दुर्घटना टळली. पहाटेपासुन गाडी पुलावर उभी असल्याने प्रवासी भेदरलेल्या अवस्थेत होते.

रेल्वे प्रशासनाने डाउन मार्गावरून येणाऱ्या सर्व गाड्या अप मार्गाने वळविल्या होत्या. यानंतर गाडी पुलावरून मार्गस्थ करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू होते. मात्र तब्बल ९ तासांच्या कामानंतर अंत्योदय एक्स्प्रेस गोरखपुरकडे रवाना झाली आहे.

- Advertisement -

मुंबई गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेसचा डबा रुळावरून घसरल्याने इगतपुरीकडे जाणारा मार्ग डाऊन मार्ग पुर्णपणे बंद करण्यात आला आहे. अप-मिडल मार्गावरून पर्यायी वाहतूक सुरू करण्यात आली आहे, असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, मध्य रेल्वेचा खोळंबा होणे हे सातत्याचे झाले आहे. सकाळच्या वेळी हा अपघात झाल्याने मुंबई नाशिक रेल्वे वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. मात्र, मध्य रेल्वेच्या लोकल वाहतूकीवर कोणताही परिणाम नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -