घरमुंबईराजकारण नको, समाजकारण करा

राजकारण नको, समाजकारण करा

Subscribe

अभिनेत्री-सविता मालपेकर…

का कुणास ठाऊक गेली काही वर्षे मी न चुकता मतदान करते. पण यावेळी मतदान का करायचे असा प्रश्न मलाच पडलेला आहे. त्याला कारण म्हणजे ज्याला आपण मतदान करतो तो उमेदवार विजयी होतो. आपल्या अपेक्षाही वाढतात पण प्रत्यक्षात हाच उमेदवार आपल्या वॉर्डमध्ये फिरकत नाही. त्याचा मनस्ताप आमच्यासारख्या सुजाण मतदाराला अधिक होतो.

- Advertisement -

त्याला कारण म्हणजे परिसरातील कामे त्याने काही कालावधीत करावीत, त्याचे नियोजन करावे हा त्यापाठीमागचा उद्देश असतो. आज माहिमवरुन फोर्टला गाडी न्यायची जरी झाली तरी योग्य वेळी पोहचू याची खात्री आपण देऊ शकत नाही. जिकडेतिकडे खड्डे आहेत. याचेच नैराश्य अधिक येते. तेव्हा मी मतदारांना विनंती करेन पक्ष, पैसा, आश्वासन याला बळी न पडता जो उमेदवार तुमचे काम करेल, ज्याची तुम्हाला खात्री आहे त्याला तुम्ही मतदान करा, त्यासाठी घराबाहेर पडा.

भले तो अपक्ष असेल, गरीब असेल पण त्याच्याकडे कामाची क्षमता असेल तर आवर्जून अशा उमेदवाराचा विचार करायला हवा. माझे म्हणणे तर आहे की ही लोक निवडणुकीचा आग्रह का धरतात? सर्वच पक्षांनी एकत्र येऊन राजकारण करण्यापेक्षा समाजकारण करण्यावर भर दिला तर देशात समस्या फारशा काही राहणार नाहीत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -