घरमुंबईडॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण; आरोपींचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण; आरोपींचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला

Subscribe

न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याचं समजतात डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा अहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या ढसाढसा रडल्या.

नायर रूग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. आज डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली. तिन्ही महिला डॉक्टरांचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळून लावला. तिन्ही महिला डॉक्टर आरोपींच्या न्यायालयीन कोठडीतही वाढ करण्यात आली आहे. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याचं समजतात डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा अहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांना अश्रु अनावर झाले.

काय आहे प्रकरण ?

डॉ. पायलने या तिघींच्या छळाला कंटाळून नायर हॉस्पिटलच्या हॉस्टेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्यावर सतत जातीवाचक शेरेबाजी करुन तिचा मानसिक छळ केल्यामुळे तिने आत्महत्या केली, असा आरोप कुटुंबियांनी केल्यामुळे पोलिसांनी तीन सहकारी महिला डॉक्‍टरांवर आत्महत्येस प्रवृत्त करणे, रॅगिंग, अट्रोसिटी कायदा तसेच माहिती तंत्रज्ञान अधिकार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास राज्य सरकारने गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण … आणि तिघींचा संयम सुटून तिघीही भरकोर्टात रडल्या

- Advertisement -

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपींना जामीन नाही

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -