घरमुंबईकोट्यवधींची वीज थकबाकी

कोट्यवधींची वीज थकबाकी

Subscribe

वसई पालघरमध्ये मिळून ५८ कोटी थकले

वसई विभागातील 1 लाख 20 हजार ग्राहकांकडे महावितरणच्या बिलापोटी तब्बल 46 कोटी 37 लाख रुपयांची थकबाकी आहे. तर पालघर विभागातील 39 हजार 900 ग्राहकांकडे तब्बल 12 कोटी 25 लाख रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसुलीसाठी महावितरणने आता धडक मोहीम हाती घेतली आहे.

अनेक ग्राहक नियमित वीज बिल भरणा करत नाहीत. अशा ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश मुख्य अभियंता रफिक शेख यांनी दिले आहेत. माहिती तंत्रज्ञान विभागाकडून मिळलेल्या यादीनुसार ही करवाई होणार आहे. थकाबाकीमुळे वीज पुरवठा खंडित केलेल्या ग्राहकाने अनधिकृत वीज पुरवठा घेतल्यास त्यांच्यावर वीज कायदा-2005 नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

- Advertisement -

थकबाकीमुळे ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केल्यानंतर सिंगल फेज ग्राहकांना 100रुपये, थ्री फेज ग्राहकांना 200रु., उच्चदाब ग्राहकांना 500 रु. व 18 टक्के जीएसटी पुनर्जोडणी शुल्क म्हणून भरणे आवश्यक असते. पण बर्‍याच वेळा या नियमाचे पालन होताना दिसत नाही. यामुळे महावितरणचा महसूल बुडतो. त्यामुळे वीज बिल थकीत ग्राहकांनी थकीत बिल व पुनर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय वीज जोडू देऊ नये, असे आदेशही देण्यात आले आहेत. तसेच या नियमाचे उल्लंघन करणार्‍या महावितरण कर्मचार्‍यांवरही कारवाई करण्यात येणार आहे.

महावितरणचे ग्राहक थकीत वीज बिल महावितरणच्या अधिकृत वीज बिल भरणा केंद्रावर भरू शकतात. तसेच महावितरणची अधिकृत वेबसाईट व मोबाईल अँप यांच्या माध्यमातूनही ग्राहक ऑनलाईन वीज बिल भरणा करू शकतात. कारवाई टाळण्यासाठी ग्राहकांनी चालू थकबाकी वेळेत भरून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता रफिक शेख यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -