ठाण्यात भंगाराची गोदामे आगीत जळून खाक

ठाणे येथील शिळफाटा परिसरात भंगाराच्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Mumbai
fire broke out at a godown in thane shilphata area
ठाण्यात भंगाराची गोदामे आगीत जळून खाक

शिळफाटा परिसरातील भंगाराच्या गोदामाला अचानक लागल्याची घटना घडली आहे. या आगीत दोन भंगारची दुकाने जाळून खाक झाली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले आहे. मात्र, या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

भंगाराचा माल जळून खाक

ठाणे येथील शिळफाटा परिसरात रॉयल क्लासिक हॉटेलच्या मागे प्रेम कोकाटे कंपाऊंडमध्ये इकबाल खान आणि हनीफ खान यांचे दोन भंगारचे गाळे आहेत. या गाळ्यात शनिवारी सकाळी ६.७५ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत दोन गाळे जळून खाक झाले असून या गाळ्यातील भंगाराचा माल जळून खाक झाले आहे. घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या जवानांने आगीवर नियंत्रण मिळवले आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.


हेही वाचा – राज ठाकरें यावेळी कोणत्या चौकटीत? भाजपने व्यंगचित्रातून उडवली खिल्ली