घरमुंबईमाटुंगा रेल्वे वर्कशॉप आग

माटुंगा रेल्वे वर्कशॉप आग

Subscribe

मध्य रेल्वेच्या माटुंगा वर्कशॉपमध्ये अचानक आग लागल्यामुळे रेल्वे विभागात खळबळ उडाली होती. मात्र अग्निशमन दलाने वेळेतच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना होताना बचावली आहे. या आगीचे कारण अद्यापही समजू शकले नाही. मात्र या आगीच्या घटनेमुळे वर्कशॉपच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थिती होत आहे.

शुक्रवारी दुपारी दरम्यान २ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास माटुंगा वर्कशॉपच्या एचसीआर शेडच्या पश्चिम बाजूस इलेक्ट्रिक (जी) उप स्टोअर विभागात अचानक आग लागली. त्यामुळे धुराचे लोट मोठ्या प्रमाणात बाहेर पडत होते. हे बघताच वर्कशॉपमधील कर्मचार्‍यांनी अग्निशम दलाला या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या पोहचल्या. तब्बल ३० मिनिटांच्या अथक परिश्रमानंतर अग्निशमन दलाला या आगीवर नियंत्रण मिळवता आले.

- Advertisement -

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार आगीच्या दुर्घटनेमुळे १५ हजार रुपयांची रेल्वे सामुग्री जळून खाक झाली. मात्र ही आग कशी लागली यांची अद्यापही माहिती मिळाली नाही. पोलीस आणि मध्य रेल्वे या आगीच्या घटनेचा पुढील तपास करत आहे. मात्र मध्य रेल्वेच्या ऐतिहासिक माटुंगा वर्कशॉपमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सांभाव्य मोठी हानी टळली
वर्कशॉपमध्ये कोट्यवधी रुपयांच्या मशिनी आहेत. रेल्वेचे इंजिन, गाड्यांच्या डब्यांची देखभाल-दुरुस्ती अशा कामांबरोबरच याठिकाणी रेल्वे कोचेस तयार केले जातात. मध्य रेल्वेच्या महत्वपूर्ण वर्कशॉपपैकी एक वर्कशॉप आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मोठी व्यवस्थासुद्धा मध्य रेल्वेकडून करण्यात आली आहे. मात्र शुक्रवारी लागलेल्या आगीमुळे येथील सुरक्षेचे तीन तेरा वाजले आहेत. जर ही आग मोठ्या प्रमाणात लागली असती तर माटुंंगा वर्कशॉपचे मोठे नुकसान झाले असते. मात्र माटुंगा वर्कशॉपच्या कर्मचार्‍यांच्या प्रसंगावधानामुळे मोठी घटना होताना टळली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -