घरमुंबईभाईंदरमधील शासकीय तलाव चोरीला

भाईंदरमधील शासकीय तलाव चोरीला

Subscribe

भूमाफियांचा अजब कारनामा

मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील वरसावे येथे सातबारा नोंदी सरकारी असलेला नैसर्गिक तलाव राजकीय भूमाफियांनी भराव करुन चोरला आहे. याबाबत आदिवासींनी ठाणे जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांकडे तक्रारी करुनसुध्दा कारवाईच केली जात नसल्याने श्रमजीवी संघटनेने संताप व्यक्त केला आहे.वरसावे नाका येथील सी एन रॉक हॉटेल जवळ पूर्वीपासूनचे नौसर्गिक पाणथळ व तलाव आहेत. यातील एक मौजे वरसावे सर्वे क्र. 90 हा सातबारा नोंदी सरकारी तलाव आहे. 8 हजार चौ.मी. इतके त्याचे क्षेत्र सातबारा नोंदी नमुद आहे.

पूर्वीपासूनचा हा नैसर्गिक तलाव पाणथळ असून स्थानिक आदिवासी सदर तलावासह या भागातील अन्य पाणथळ – तलावाचा वापर करत आले आहेत. त्यातही सातबारा नोंदी सरकारी तलाव असताना या जागेत राजकिय माफियांच्या वरदहस्ताखाली भराव सुरू करण्यात आला. एप्रिल 2016 मध्ये आदिवासींनी तत्कालीन महापालिका आयुक्त व तहसिलदार, ठाणे यांना लेखी तक्रार दिली. पण तक्रारी करुन देखील राजकीय माफियांच्या वरदहस्तामुळे बेधडक भराव सुरुच ठेवण्यात आला.

- Advertisement -

स्थानिक आदिवासींच्या तक्रारींवर कारवाई होत नसल्याने फेब्रुवारी 2017 मध्ये श्रमजीवी संघटनेने जिल्हाधिकारी ठाणे यांना लेखी निवेदने देण्यास सुरवात केली. दरम्यान, याभागातील नैसर्गिक पाणतळ-तलावात मोठ्या प्रमाणात भराव करुन त्यात बांधकामे केली गेली. इको सेंसेटीव्ह झोन असूनही डोंगर फोडला गेला व मोठमोठी झाडे मारण्यात आली. वन विभागाने पाहणी करुन अहवाल दिला तर इको सेंसेटीव्ह झोन समितीत चर्चा झाली. पण अजूनही गुन्हा दाखल झाला नाही वा कार्यवाही केली गेली नाही.

परंतु तलाव भराव करुन बुजवण्यात आला आणि त्यावर कब्जा करण्यात आला तरीदेखील आजपर्यंत जिल्हाधिकारी ठाणे व संबंधित महसूल विभाग तर दुसरीकडे आयुक्त व महापालिका प्रशासनाने कारवाईच केली नाही. श्रमजीवी संघटनेने महापालिकेवर मोर्चा काढला त्यातदेखील वरसावेचा सरकारी तलाव चोरीला गेल्याचा मुद्दा बाळाराम भोईर यांनी आयुक्त बालाजी खतगावकर यांच्याकडे मांडला. पण आयुक्तांनी चक्क तो तलाव सरकारी असून पालिकेला हस्तांतरीत झालेला नाही असे सांगून आपले हात झटकले.

- Advertisement -

तलाव हा आदिवासी लोकांच्या हिताचा असतानाही त्याच्यावर स्थानिक राजकारण्यांनी हडप केला आहे. तो तलाव पूर्ववत करून लोकांकरता राखीव ठेवला पाहिजे.
-सुलतान पटेल, कार्याध्यक्ष, श्रमजीवी संघटना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -