गंगा, जमुना,गोदावरी पोहोचल्या मॉरिशसला

Mumbai
आदिवासींच्या राख्यांना मोठी मागणी

वसईतील विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटरच्या आदिवासी महिलांनी बांबुपासून बनवलेल्या राख्या मॉरिशसला पोहोचल्या आहेत. या शेकडो राख्यांची विक्रीही झाली आहे.

भालीवली येथील विवेक सेंटरने 60 आदिवासी महिलांना बांबुपासून राख्या, ट्रे, मोबाईल स्टॅण्ड, खुर्च्या, पाळणे,बेड बनवण्याचे मोफत प्रशिक्षण दिले होते. त्यामुळे त्यांना स्वयंरोजगार मिळाला आहे. या महिलांनी रक्षाबंधनच्या निमित्ताने बांबुपासून पाच प्रकारच्या कलात्मक राख्या बनवल्या आहेत. या राख्यांना गंगा, जमुना, सरस्वती, कावेरी आणि गोदावरी अशी नावे देण्यात आली आहेत.

वसईतील तरुणांच्या एका गटाला या राख्या आवडल्या त्यांनी 250 राख्या खरेदी करून त्या मॉरिशसमधील प्रदर्शनात मांडल्या. तिथे त्यांची चांगली विक्री झाली. नैर्सगिक रंग, लाकडी मणी आणि बांबुंचे क्लिलिंग तसेच अत्यंत टिकाऊ असल्यामुळे त्या शो पीस म्हणूनही कायम ठेवता येत असल्यामुळे या राख्यांना चांगली मागणी आहे.

बांबु प्रशिक्षणामुळे शेतीच्या रोजगारापासून वंचित राहिलेल्या आदिवासी महिलांनी दरमहा 6 ते 8 हजार रुपयांची आवक होत असल्याचे या प्रकल्पातील प्रशिक्षक प्रगती भोईर यांनी सांगितले. या महिलांना आर्थिकदृष्ठ्या आणखी सक्षम करण्यासाठी विवेक प्रकल्पाला भेट देवून त्यांनी हाताने तयार केलेल्या वस्तू खरेदी कराव्यात त्यासाठी 7798711333 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही भोईर यांनी केले आहे.