घरमुंबईमुंबईत गोवर रूबेलाची ९० टक्के बालकांना लस

मुंबईत गोवर रूबेलाची ९० टक्के बालकांना लस

Subscribe

गोवर रूबेला मोहीमेअंतर्गत मुंबईत ९० टक्के तर राज्यात ९६ टक्के बालकांचं लसीकरण करण्यात आले आहे.

गोवर रूबेला मोहीमेअंतर्गत मुंबईत ९० टक्के तर राज्यात ९६ टक्के बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे. उर्वरित बालकांना ही लस देण्यात येणार असून, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी, आयएपी/आयएमए, रोटरी क्लबचे सदस्य यांच्या सहाय्याने ही मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

गोवरमुळे भारतात दरवर्षी सुमारे ५० हजार रुग्ण दगावतात. रुबेला हा पूर्णपणे संसर्गजन्य आहे. अशा गंभीर आजारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्यात ९ महिने ते १५ वर्षाखालील सर्व बालकांसाठी २७ नोव्हेंबर पासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. आता ज्या बालकांचे लसीकरण झाले नाही, अशांसाठी शाळांमध्ये दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. त्याचबरोबर सरकारी दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्रे या ठिकाणी मोफत लसीकरण करण्यात येत आहे.

- Advertisement -

मुंबईतील एफ दक्षिण आणि पी उत्तर वॉर्डमध्ये गोवर रूबेलाचे रूग्ण आढळून आले असल्याबाबतची लक्षवेधी सदस्य अमीन पटेल यांनी विधानसभेत मांडली होती. त्याला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून गोवर रूबेला मोहिमेत २२ लाख ६७ हजार ३६५ मुलांना म्हणजेच ९० टक्के मुलांना लसीकरण करण्यात आले.

लसीकरणामुळे एकाही बालकाचा मृत्यू नाही 

मोहिमेच्या सुरूवातीला अल्पसंख्याक बहुल विभागातील शाळेत नकार देणाऱ्या पालकांची संख्या लक्षणीय होती. पण, वारंवार पालक सभा घेऊन सामाजिक कार्यकर्त्यांशी, धार्मिक आणि राजकीय नेत्यांशी संवाद साधून मोहीम यशस्वी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचबरोबर जनजागृती करण्यासाठी प्रादेशिक तसेच इंग्रजी वृत्तपत्रात या मोहिमेची जाहिरात, रेल्वे गाड्यांवरती जाहिरात, रेडिओ वाहिनीवरून कार्यक्रम प्रसिद्धी, रेल्वे फ्लायओवर पुलावर जाहिरात पोस्टर, बॅनर्स आणि माहितीपत्रके याद्वारे प्रसिद्धी करण्यात आली. उर्वरित १० टक्के बालकांनाही ही लस देण्यासाठी मोहीम सुरू असून, गोवर-रूबेलामुळे एकही बालक मृत्युमुखी पडल्याची घटना घडलेली नाही, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

मुंबईतील ‘या’ रेल्वे स्थानकांचे बदलणार रुप

नाशिकमध्ये महासभेच्या पीठासनावर नगरसेवकांचा रात्रभर ठिय्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -