घरमुंबईआरोपी सनातन संस्थेच्या ‘क्षात्रधर्म साधना’ पुस्तकाने प्रेरित

आरोपी सनातन संस्थेच्या ‘क्षात्रधर्म साधना’ पुस्तकाने प्रेरित

Subscribe

एटीएसच्या आरोपपत्रात उल्लेख नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण

नालासोपारा शस्त्रसाठाप्रकरणी कारवाई करून अटक करण्यात आलेल्या आरोपींनी सनातन संस्थेच्या ‘क्षात्रधर्म साधना’ या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे हिंदूराष्ट्र निर्मितीसाठी ते प्रयत्न केला असल्याचा उल्लेख आरोपपत्रात एटीएसने केला आहे. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे वेगवेगळ्या हिंदुत्ववादी संघटनांचे असून हिंदुराष्ट्र निर्मितीसाठी प्रेरित होऊन त्यांनी समविचारी लोकांची टोळी उभी केल्याचा आरोप या आरोपपत्रात करण्यात आलेला आहे. सोबतच सनातन संस्थेच्या ‘क्षात्रधर्म साधना’ या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे हिंदुराष्ट्र निर्मितीसाठी ते प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली असल्यामुळे ही कारवाई केली असल्याचे आरोपत्रात एटीएसने म्हटले आहे.

नालासोपारा शस्त्रसाठाप्रकरणी कारवाई करून अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध विशेष सत्र न्यायालयात आज(बुधवारी ) युएपीएअंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यामध्ये एकूण १२ जणांविरुद्ध ६४८२ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून नालासोपारा येथून अटक करण्यात आलेले वैभव राऊत,शरद कळसकर,सुधन्वा गोंधळेकर यांच्यावर स्फोटके बाळगल्याप्रकरणी १० ऑगस्ट २०१८ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीदरम्यान मुंबई,पुणे,सातारा,सोलापूर,नालासोपारा या ठिकाणी ते घातपात घडवणार असल्याचे धागेदोरे मिळाले होते.

- Advertisement -

त्यानुसार ठिकठिकाणी कारवाई करत दहशतवादी विरोधी पथकाने १२ जणांना अटक केली होती. यानुसार वैभव राऊत,शरद कळसकर,सुधन्वा गोंधळेकर,श्रीकांत पांगारकर,अविनाश पवार,विजय लोधी,वासुदेव सुर्यवंशी,प्रविण रंगास्वामी,भारत कुरणे,अमोल काळे,अमित बड्डी,गणेश मिथून यांच्याविरुद्ध एटीएसने बुधवारी सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. कायद्यानुसार बेकायदेशीर शस्त्रसाठा बाळगणे आणि बेकायदेशीर कृत्ये या कायद्यान्वये आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी आणि पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडून कायदेशीर परवानागी घेऊन एटीएसने आज ६४८२ हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -