Thursday, January 14, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई मांजरीमुळे झाला मर्सिडीजचा मुंबईत भीषण अपघात

मांजरीमुळे झाला मर्सिडीजचा मुंबईत भीषण अपघात

मांजरीला वाचण्याचा प्रयत्न करताना कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटला

Related Story

- Advertisement -

मुंबईतील मलबार हिल परिसरात भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. मांजरीला वाचवण्यासाठी भरधाव वेगात असलेली मर्सिडीज कार डिव्हायडरवर आदळली. मांजरीला वाचण्याचा प्रयत्न करताना कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार डिव्हायडरवर जाऊन धडकली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.

असा घडली घटना

मुंबईत असणाऱ्या मलबार हिल परिसरात मर्सिडीज कार डिव्हायडरवर आदळली. यावेळी कारमध्ये दोघे जण होते, मात्र कोणालाही दुखापत झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार कारसमोर अचानक मांजर आल्यामुळे तिला वाचवण्याच्या प्रयत्नात कारवरचं नियंत्रण सुटलं. त्यानंतर मर्सिडीज कार डिव्हायडरवर चढली आणि हा अपघात झाला.

- Advertisement -

कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात ताबा सुटला

गेल्या डिसेंबर महिन्यात पुण्यातील डेक्कन परिसरात कुत्र्याचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात मोठा अपघात झाला होता. गाडी वेगात असताना अचानक कुत्रा गाडी समोर आला. कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि गाडी गरवारे पुलावरुन भुयारी मार्गात कोसळली. त्यावेळीही कोणाला गंभीर दुखापत झालेली नव्हती. वसईत वेगात असलेल्या तवेरा गाडीने पेट घेतल्याची घटना घडली आहे. वसई पश्चिमेकडील सनसिटी परिसरात गुरुवारी सकाळी ६ वाजता हा प्रकार घडला. ही टुरिस्ट गाडी असून गाडीतून गास गावातील काही जण महाबळेश्वरला फिरायला जाण्यासाठी निघाले होते. घरातून अवघ्या काही अंतरावर गेली असताना अचानक गाडीने पेट घेतला. गाडीतील प्रवासी प्रसंगावधान राखून तात्काळ खाली उतरल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र गाडीच्या इंजिनच्या आसपासचा भाग जळून खाक झाला होता.

- Advertisement -