घरमुंबईहत्या की आत्महत्या?; इमारतीवरून पडून MMRDA च्या अधिकार्‍याचा मृत्यू

हत्या की आत्महत्या?; इमारतीवरून पडून MMRDA च्या अधिकार्‍याचा मृत्यू

Subscribe

इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन पडून एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी कुलविंदर सिंग कपूर (वय ५५) यांचा रात्री उशिरा मृत्यू झाला. याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. कुलविंदर यांचा अपघातात मृत्यू झाला की त्यांनी आत्महत्या केली, याचा आता पोलिसांकडून तपास सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद मुळ्ये यांनी सांगितले.

वांद्रे येथील बीकेसी, एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांसाठी असलेल्या वसाहतीत कुलविंदर कपूर हे त्यांच्या पत्नी आणि मुलासोबत राहत होते. सध्या ते एमएमआरडीएमध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी रात्री उशिरा एक वाजता ते त्यांच्या राहत्या घराच्या बाल्कनीतून खाली पडले होते. हा प्रकार इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला समजताच त्याने इतर रहिवाशांना ही माहिती दिली. त्यांना तातडीने जवळच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांचा मृत्यू झाला. ही माहिती मिळताच वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांच्या पत्नीसह मुलाची जबानी नोंदवण्यात आली असून त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही. या जबानीनंतर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. कुलविंदर हे चवथ्या मजल्यावरून पडले की त्यांनी आत्महत्या केली याचा खुलासा होऊ शकला नाही. चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या घटनेने स्थानिक एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.

- Advertisement -

हेही वाचा –

कंगनाच्या मनालीतील घरावर गोळीबार; म्हणाली, ‘मला घाबरवण्याचा होतोय प्रयत्न’!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -