घरमुंबईमुंबईची शान असलेल्या काली पिलीला अलविदा

मुंबईची शान असलेल्या काली पिलीला अलविदा

Subscribe

१९६४ पासून मुंबइकरांची सेवा करणाऱ्या काली पिलीला निरोप

छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाची अवाढव्य ब्रिटिश युगातील इमारत, छोट्या मोठ्या गोष्टी विकणारे विक्रेता, आप आपल्या कामाला जाण्याच्या घाई मध्ये असलेल्या लोकांची गर्दी आणि शेवटी म्हणजे या गर्दीतल्या लोकांना आपल्या स्थानापर्यंत पोहोचवणारी ती काली पिली टॅक्सी. असं काही चित्र आहे या मुंबई उपनगरीचं. अनेक वर्षांपासून ही काली पिली टॅक्सी मुंबईची शान आहे. ‘प्रीमियर पद्मिनी’ या इंडो-इटालियन मॉडेलच्या टॅक्सीच उत्पादन २००० सालीचं बंद झालं. आताच्या दिवसात प्रीमियर पद्मिनीच्या अवघ्या ५० पेक्षा कमी गाड्या रस्त्यावर दिसतात. जून २०२० पर्यंत या गाड्या पूर्णपणे बंद केल्या जाणार आहेत.
फियाट ११०० या गाडीच स्वदेशी आवृत्ती म्हणजे फियाट ११०० डिलाईट म्हणून या गाडीनं १९६४ मध्ये पदार्पण केलं. १९७४ मध्ये गाडीच नाव प्रीमियर प्रेसिडेंट मध्ये बदललं गेलं आणि नंतर त्याचं नाव दिग्गज भारतीय राणी पद्मिनीच्या नावावर प्रीमियर पद्मिनी ठेवलं गेलं. नंतरच्या ३ दशकात रस्त्यावर व लोकांच्या मनावर अधिराज्य केलं.

कशी होती ही काली पिली?

असं म्हंणाल जात की १९६० मध्ये लोक कोलकाता आणि दिल्लीमध्ये लोकप्रिय असलेल्या अम्बॅसिडर गाडी पेक्षा पद्मिनीला निवडायचे. आजकल रसत्यावर पद्मिनी टॅक्सी नाहीशा झाल्या आहेत असं इतिहासकार दीपक राव यांचं म्हणन आहे. एक साधि अशी गाडी असली तरी लोकांना त्यावर गर्व होता. १९७०-८० साली या गाडीचा इतका धंदा झाला की १९९० मध्ये चक्क ६३,२०० काल्या पिल्या टॅकस्यांची परिवहन विभागात नोंद झाली. मुंबईत येणाऱ्या लोकांचा मुंबईच्या त्यांच्या अनुभवात या पद्मिनीत एकतरी फेरी असायची.
टॅक्सी चालकांसाठी पद्मिनी ही फक्त एक टॅक्सी नसून एक साथीदार होती. ग्राहकही या टॅक्सी पासून संतुष्ट असायचे म्हणून ग्राहकही खूश व टॅक्सी चालकही खूश.

- Advertisement -

“हे एका कौटुंबिक कारसारखे होते जिथे प्रत्येकजण सहज बसू शकेल, सध्याच्या टॅक्सीच्या जागेपेक्षा समोरची सीट मोठी होती चालकासह तीन जणांना सामावून घेण्या इतकी” राव म्हणतात.

- Advertisement -

मुंबई टॅक्सिमिनचे युनियन नेते ए एल क्वाड्रोस हे म्हणतात की भरपूर वर्ष कोट्यवधी प्रवाशांना चांगली कामगिरी आणि सेवा या टॅक्सीने दिली.

पद्मिनी ही त्या काळी ‘सुपरस्टार’ होती कारण ‘गमन’ सारख्या अनेक चित्रपटात तिचा वापर झाला होता.प्रीमियर पद्मिनीचा काळ संपत असताना सांत्रो, ओमनी, इको, वॅगनर या गाड्यांनी काली पिलीच रूप घेतलं.

हे ही पाहा: धक्कादायक! कासवाच्या पोटात आढळले १०४ प्लास्टिकचे तुकडे

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -