मेगा ब्लॉकमुळे मुंबईकर हैराण

मुंबईकरांच्या सुटीच्या झाला फियास्को

Mumbai
mumbai local train mega block
प्रातिनिधिक छायाचित्र

रेल्वेच्या तिन्ही मार्गवर रेल्वेकडून रविवारी घेण्यात आलेल्या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगाहाल झाले आहे. विशेष म्हणजे आसनगाव-कसारा मार्गवर सुद्धा मध्य रेल्वेकडून स्पेशल पॉवर ब्लॉक घेतल्याने लांब पल्याच्या गाड्या आणि उपनगरीय लोकल सेवेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.

मेगा ब्लॉकच कारण देत मध्य रेल्वेने अर्धापेक्षा जास्त लोकल सेवा रद्द करण्यात आल्या होत्या. परिणामी प्रवाशांना तासतास रेल्वेगाडयांची प्रतीक्षा करत रेल्वे स्थानकांवर ताटकर उभे राहावे लागले आहे. इतकेच नव्हेत तर मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे अनेकांच्या सुट्टीच्या फियास्को झाल्याचे दिसून आले आहेत. माटुंगा ते मुलुंड डाऊन जलद मार्गावर घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे धीम्या मार्गावरील लोकल फेर्‍यावर परिणाम झाला. याकाळात लोकल फेर्‍या सुमारे 25 ते 30 मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवासी बेहाल झाले होते. तर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी स्थानकां दरम्यान स्थानकां ब्लॉकची कामे हाती घेण्यात आली होती.

यामुळे अप आणि डाऊन दोन्हीमार्गावरील लोकल फेर्‍या रद्द करण्यात आल्या. यामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांनी पर्यायी मार्गाने प्रवास करण्याला पसंती दिली. मात्र ब्लॉक संपल्यानंतर ही मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल फेर्‍यामध्ये गर्दी असल्याने रेल्वे प्रवाशांसाठी रविवारी प्रचंड हाल झाले. विशेष म्हणजे दादर,कुर्ला, आणि ठाणे रेल्वे स्थानकावर गर्दीमुळे चेगराचेंगरी होउून नये, म्हणून मोठया प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले होते.