घरमुंबईजलसमाधी मिळालेल्या 'तरंगत्या' हॉटेलची खास वैशिष्ट्ये...

जलसमाधी मिळालेल्या ‘तरंगत्या’ हॉटेलची खास वैशिष्ट्ये…

Subscribe

नुकतेच मुंबईच्या वांद्रे-वरळी सी लिंकजवळील समुद्रात, क्रूझवरील तरंगते हॉटेल सुरु करण्यात आले होते. मात्र, दुर्देवाने शनिवारी दुपारी पाण्यात उभे असलेले हे जहाज पलटले आणि मुंबईतील पहिल्या-वहिल्या फ्लोटिंग हॉटेलला जलसमाधी मिळली. सुदैवाने या बोटीवरील सर्व कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आल्यामुळे कोणतीच जीवितहानी झाली नाही.

का बुडाली क्रूझ?

मुंबई मेडन नावाची ही क्रूझ दुपारच्यावेळी समुद्राला भरती आलेली असताना अचानक बुडायला सुरुवात झाली. काही वेळातच बोटीच्या खालच्या भागातून बोटीमध्ये पाणी भरायला सुरुवात झाली. तातडीने याबाबतची सूचना यंत्रणेद्वारे सर्व कामगारांना देण्यात आली आणि त्यामुळे कामगारांना आपला जीव वाचवण्यास पुरेसा वेळ मिळाला. पाण्यातील अँकरच्या पकडीतून निसटल्यामुळे ही क्रूझ बुडल्याचं बोललं जात असलं, तरी याबाबत अद्याप कोणतही ठोस कारण समोर आलेलं नाही.

- Advertisement -

असे होते क्रूझवरील तरंगते हॉटेल

एआरके डेक बार असं जलसमाधी मिळालेल्या या तरंगत्या रेस्टॉरंटचे नाव होते. ज्याप्रमाणे परदेशात तसंच गोव्यामध्ये क्रूझवरील तरंगत्या हॉटेलचा अनुभव पर्यटकांना दिला जातो, त्याचप्रमाणे मुंबईकरांनाही ही मजा अनुभवता यावी यासाठी क्रूझ व त्यावरील हॉटेल सुरु करण्यात आले होते. पाहूया त्या क्रूझची व त्यावरील रेस्टॉरंटची खास वैशिष्ट्ये-

- Advertisement -
  • वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या डाव्या बाजूला एक जेट्टी बांधण्यात आली होती.
  • या जेट्टीवरुन  छोट्या पॉवर बोटीने लोकांना ‘मुंबई मेडन’ क्रूझजवळ पोहोचवले जायचे.
  • एकावेळी साधारण २८५ पर्यटक या क्रूझवर सवार होतील इतकी त्याची क्षमता होती.
  • तुम्हाला निश्चित करुन दिलेल्या वेळेत, ही क्रूझ सातत्याने पाण्यात फिरत राहायची.

 

(सर्व फोटो mumbaimaiden वेबसाईटच्या सौजन्याने)

  • पर्यटकांचे सर्वतोपरी मनोरंजन होईल अशा सोयी क्रूझमध्ये करण्यात आल्या होत्या.
  • क्रूझच्या सर्वांत वरच्या मजल्यावरुन ३६० अंशांच्या कोनातून संपूर्ण सागरकिनारा पाहण्याची अनोखी संधी होती.
  • रात्रीच्या वेळी वांद्रे-वरळी सी लिंकचे देखणे रुप पर्यटक क्रूझवरुन अनुभवू शकायचे.
  • क्रूझवरील रेस्टॉरंटमध्ये खाण्या-पिण्याची पदार्थांची रेलचेल होती.
  • क्रूझवर तुम्हाला लाईव्ह म्युझिकचा देखील आनंद दिला जायचा.
  • याशिवाय बर्थडे पार्टीज तसंच अन्य समारंभांसाठी क्रूझवर खास बँक्वेट हॉलची सोय करण्यात आली होती.
बुडालेल्या हॉटेलमध्ये भाजप नेत्याची भागीदारी ?

तरंगते हॉटेल बुडाल्यानंतर आता भाजपच्या एका नेत्याची या हॉटेलमध्ये भागीदारी असल्याचं बोललं जात आहे. भाजपच्या एका नेत्याने या हॉटेलसाठी खास वशिला लावला असल्याच्या तसेच त्याची यामध्ये खूप मोठी गुंतवणूक असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतेही ठोस पुरावे समोर आलेले नाहीत.

मुंबईकर झाला ‘नाराज’

याप्रकरणी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक पर्यटकांनी आणि विशेषत: मुंबईकरांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. यानिमित्ताने मुंबईकरांना पहिल्यांदाच तरंगत्या हॉटेलचा अनुभव घेता येणार होता. मात्र, ‘या दुर्देवी घटनेमुळे त्या आगळ्यावेगळ्या अनुभवाला आम्ही मुकलो’ अशी खंत मुंबईकरांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -