घरमुंबईराजेश मारु एमआरआय मशीन प्रकरण; कुटुंबियांना दहा लाखांची मदत

राजेश मारु एमआरआय मशीन प्रकरण; कुटुंबियांना दहा लाखांची मदत

Subscribe

फिक्स्ड डिपॉझिटमध्ये दहा लाखांपैकी पाच लाख ठेवून बाकी उरलेले पाच लाख रुपये हे सहा आठवड्यात मारू कुटुंबाला देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

गेल्या वर्षी नायर रुग्णालयामध्ये एमआरआय मशीनमध्ये अडकून राजेश मारू या व्यक्तीने जीव गमावला होता. याच पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने मारू यांच्या कुटुंबियांना अंतरिम भरपाई म्हणून दहा लाख रुपये देण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले आहेत. ही दुर्देवी घटना फेब्रुवारी २०१८ मध्ये घडली होती. मारू कुटुंबियांनी या अपघाताला मुंबई महापालिकेचं नायर रुग्णालय जबाबदार असल्याचा आरोप करून कोर्टात धाव घेतली होती.

म्हणून मुंबई महापालिका प्रशासनाला कोर्टाने निकाल देताना मारू कुटुंबियांनी दहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. फिक्स्ड डिपॉझिटमध्ये दहा लाखांपैकी पाच लाख ठेवून बाकी उरलेले पाच लाख रुपये हे सहा आठवड्यात मारू कुटुंबाला देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

- Advertisement -

नक्की काय घडलं?

एमआरआय विभागामध्ये राजेश मारू हे ऑक्सिजनच्या सिलेंडर घेऊन गेले होते. वॉर्ड बॉय किंवा या विभागातील संबंधित डॉक्टरांनी सिलेंडर आत नेण्यास कोणत्याही प्रकारचा आक्षेप केला नाही. त्यामुळे आतमध्ये सिलेंडर घेऊन गेलेल्या मारूंना मशिनच्या विद्युतचुंबकीय क्षेत्राने खेचले होते. म्हणून राजेश यांचा विचित्र अपघातात जीव गेला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -