घरमुंबईभाजप आमदाराचा मस्तवालपणा! भाऊ, मेहुण्यासाठी प्रशासनावर दबाव

भाजप आमदाराचा मस्तवालपणा! भाऊ, मेहुण्यासाठी प्रशासनावर दबाव

Subscribe

‘सत्तेचा मस्तवालपणा’ या शब्दाचा अगदी योग्य अर्थ मीरा-भाईंदरमध्ये भाजप आमदाराकडून अनुभवता येत आहे. आमदार नरेंद्र मेहतांचा भाऊ आणि मेहुण्याविरोधात पर्यावरणाला हानी पोहोचवल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण, ‘हा गुन्हा रद्द करा किंवा फिर्यादी महसूल अधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करा’, अशी तर्कट मागणी मेहतांनी केली आहे.

…आणि आमदारांनी मांडलं पोलिस ठाण्यात ठाण!

विनोद मेहता आणि रजनीकांत सिंह अशी मेहतांच्या भाऊ आणि मेहुण्याची नावे आहेत. या दोघांविरोधातले सारे प्रकरण आमदार महाशयांनी खूप मनावर घेतले. त्यासाठी त्यांनी गुरूवारी संध्याकाळी ७ वाजल्यापासून पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसणे पसंत केले.

- Advertisement -
क्लब ७११च्या संरक्षण भींतीचे अर्धवट अवस्थेतील काम

काय आहे प्रकरण?

मीरा – भाईंदर पालिका हद्दीत असणा-या ७११ क्लबचे काम अपूर्ण असताना १२ मे रोजी त्याचे दणक्यात उद्धाटन करण्यात आले. शिवाय सदस्य नोंदणी शुक्ल देखील आकारले गेले. पण, या क्लबच्या भींतीचे काम अपूर्णच राहिले. तसेच परवानगीशिवाय भराव देखील टाकला गेला. या प्रकरणी महसूल अधिकाऱ्यांनी आमदार नरेंद्र मेहतांचा भाऊ विनोद मेहता आणि मेहुणा रजनीकांत सिंह विरोधात गुन्हा दाखल केला. विनोद आणि रजनीकांतचा हा काही पहिला गुन्हा नसून यापूर्वी देखील त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. विनोद मेहता हे महापौर डिंपल मेहता यांचे पती आहेत.

आमदार नरेंद्र मेहतांचे मुख्यमंत्री कनेक्शन!

आमदार नरेंद्र मेहता हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यामुळे मेहता सत्तेचा दुरूपयोग करून प्रशासनावर दबाव टाकत आहेत. त्यामुळे आमदार मेहतांची मुजोरी रोखा, मागणी या विभागातील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -