घरमुंबईमराठा आरक्षण नाही, भरती नाही - सिडकोची भरती स्थगित

मराठा आरक्षण नाही, भरती नाही – सिडकोची भरती स्थगित

Subscribe

मराठा आरक्षण लागू होण्यापूर्वी सिडकोने जी ८६ प्रथम व द्वितीय श्रेणी अधिकार्‍यांची भरती जाहीर केली होती त्या भरतीसाठी शनिवार व रविवार अशी दोन दिवस ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय सिडकोकडून घेण्यात आला होता.त्या अगोदरच सिडको कर्मचारी संघटनेने या ऑनलाईन परीक्षेला विरोध करत परीक्षा स्थगित करून त्या भरती प्रक्रियेत मराठा समाजालाही समाविष्ट करून घ्यावे, अशी मागणी केली.यावर सिडकोने सकारात्मक भूमिका घेत ही परीक्षा स्थगित केली आहे. त्यामुळे आता या भरतीचा मराठ्यांनाही लाभ मिळणार आहे, असे यावेळी संघटनेचे जे.टी.पाटील यांनी सांगितले.
राज्य सरकारने मराठा समाजाला शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात १६ टक्के आरक्षण जाहीर केले असून तसा अध्यादेश काढला आहे. शासनाची निमशासकीय कंपनी असलेल्या सिडकोतील अभियंता नोकरभरतीत या समाजाला डावलण्यात आल्याची चर्चा सिडको वर्तुळात सुरु होती.

त्यामुळे सिडको कर्मचारी संघटनेने सदर भरतीत बदल करून नव्याने भरती करावी अशी मागणी केली. मराठा आरक्षण नुकतेच लागू झाले असले तरी त्याचा फायदा शहरातील मराठा समाजातील नागरिकांना मिळावा अशी मागणी यावेळी पाटील यांनी केली. २ हजार ७०० कर्मचारी, अधिकार्‍यांच्या क्षमता असलेल्या सिडकोत केवळ १५०० कर्मचारी काम करीत असल्याने अनेक कर्मचारी, अधिकार्‍यांवर कामाचा ताण वाढत आहे. त्यामुळे सिडकोने कर्मचारी, अधिकारी नोकरभरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. मध्यंतरी प्रकल्पग्रस्तांना या नोकरभरतीत डावलण्यात आल्याने अभियंत्यांची नोकरभरती स्थगित करण्यात आली होती.

- Advertisement -

राज्य सरकारने मराठा आरक्षण जाहीर करण्यापूर्वी सिडकोने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत ८६ प्रथम व द्वितीय श्रेणी अधिकार्‍यांची भरती जाहीर केली आहे. यात चार सहाय्यक विधि अधिकारी, तीन कार्यकारी अभियंता, एक टेलिकॉमसाठी अभियंता, प्रोग्रामर, आणि ७६ स्थापत्य अभियंता अशी ८६ अधिकार्‍यांची नोकरभरती केली जाणार आहे. त्याची येत्या १५ व १६ डिसेंबर रोजी (शनिवार व रविवारी) ऑनलाइन परीक्षा ठेवण्यात आली होती. त्याअगोदरच परीक्षा सिडकोकडून पुढे ढकलण्यात आल्याने काही प्रमाणात नाराजी तर काही प्रमाणात खुशी व्यक्त करण्यात आली.जर सिडकोने संघटनेची मागणी फेटाळली असती तर सिडकोला मराठा समाजाच्या आक्रोशाला सामोरे जावे लागले असते.त्यामुळेच ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली अशी चर्चा आहे.

सिडकोने जी ८६ प्रथम व द्वितीय श्रेणी अधिकार्‍यांची भरती जाहीर केली ती पुढे ढकलण्यात आली आहे.कोणत्या कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आली आहे हे सांगता येणार नसून ती कधी होईल हे संचालक मंडळ ठरवेल.
-प्रिया रातांबे – जनसंपर्क अधिकारी ,सिडको

- Advertisement -

सिडकोत प्रथम व द्वितीय श्रेणी अधिकार्‍यांच्या नोकरभरतीची जाहिरात मराठा आरक्षण जाहीर होण्याअगोदर देण्यात आली होती.त्यानुसारच सदरील परीक्षा घेण्यात आल्या होत्या.त्याच दरम्यान मराठा आरक्षण लागू झाल्याने ही परीक्षा स्थगित करून नव्याने त्या घेण्यात याव्यात अशी मागणी आम्ही केली होती.त्यानुसार सिडकोने परीक्षा स्थगित केली असून पुढे ढकलली आहे.नोकरभरतीत वाद विविद टाळता यावेत असा आमचा प्रयत्न असून प्रकल्पग्रस्तांवरही अन्याय होता कामा नये असा उद्देश आहे.
-जे. टी. पाटील – सचिव, सिडको कामगार संघटना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -