घरमुंबईपोलीस दलातील खबरे लयाला

पोलीस दलातील खबरे लयाला

Subscribe

एकेकाळी मोठमोठ्या गायब आरोपींपर्यंत पाहोचण्यासाठी आणि शहरात घडणाऱ्या संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी पोलीस दलाचा कणा म्हणून काम करणारे खबरी आता शहरातून हद्दपार झाले आहेत. त्यांची जागा गेल्या वर्षांत झिरो पोलिसांनी केव्हाच घेवून टाकली आहे. खबऱ्यांना पोलिसांना पोसावे लागत होते. याउलट आता झिरो पोलीसच पोलिसांना पोसत आहेत. खबऱ्यांची एकट्या मुंबई शहरातील संख्या पाच हजार होती. ती आता केवळ दीडशे ते दोनशेवर आल्याचे पोलीस सागंत आहेत. खबऱ्यांअभावी माहिती प्राप्त करणे पोलिसांना अवघडत जात आहे.

मुंबईत डान्सबार आणि मटका, जुगार तेजीत

- Advertisement -

१९९० च्या दशकात पोलिसांच्या अनेक चकमकीत शेकडो गुंड मारले गेले होते. त्याचे बहुतांश श्रेय हे खबरींना जाते. कोण कोठे येणार, कोठे थांबणार ही इत्यंभूत माहिती त्यावेळी पोलीस दलात नावाजलेल्या एन्काऊटर स्पेशालिस्टना खबरीच देत होते. त्यावेळी पोलिसांची कमाईही रग्गड होती. मुंबईत डान्सबार आणि मटका, जुगार तेजीत होता. इतकेच नाहीतर गावठी दारुचा पुरवठाही मोठा असायचा. त्यामुळे त्यातून मोठे उत्पन्न पोलिसांना मिळत होते. त्यातील काही भाग हा खबरींवर खर्च केला जायचा. दुसरीकडे पोलिसांसाठी सरकारी पातळीवरुन देण्यात येणारा ‘सिक्रेट फंड’ ही या खबरींसाठी वापरला जात होता. आता मात्र हा फंड खबरींवर वापरण्याइतपत स्थिती नाही. बेकायदेशीर धंदे बंद होत असल्याने पोलिसांची कमाईही कमी झाली आहे. त्यामुळे अनेकदा ‘सिक्रेट फंडाचाङ्क वापर ते इतर कार्यक्रमासाठी करत असल्याचे पोलीसच सांगतात. आता खबèयांची जागा झिरो पोलिसांनी घेतली आहे हे सांगली येथील विश्राम बाग पोलीस ठाण्यातील अनिकेत कोथळे प्रकरणातून दिसून आले आहे.

खबरींना पोसणं पोलिसांच्या आवाक्याबाहेर

- Advertisement -

दरम्यान, मुंबईत खबरींचे प्रमाण घटल्याने पोलिसांपुढील अचडणी वाढत आहेत. खबरींना पोसणं पोलिसांच्या आवाक्याबाहेर गेल्याचे एका अधिकाऱ्याने बोलताना स्पष्ट केले. पूर्वी एन्काऊटरफेम अधिकारी विजय साळसकर यांच्याकडे खबरींची फौजच होती. तर नुकतेच निवृत्त झालेले सहाय्यक पोलीस आयुक्त प्रफुल्ल भोसले यांच्याकडेही खबरी बऱ्यापैकी होते. यामुळेच या अधिकाऱ्यांनी चांगली कामगिरी केली. दया नायक यांच्यासारख्या अधिकाऱ्यांकडे खबरीचे नेटवर्क बऱ्यापैकी असले तरी त्यांच्याकडेही बोटावर मोजण्याइतकेच खबरे शिल्लक असल्याचे सांगितले जाते.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -