घरमुंबईपुरावा नष्ट करण्यासाठी राफेलच्या फाईलची चोरी

पुरावा नष्ट करण्यासाठी राफेलच्या फाईलची चोरी

Subscribe

शेकापच्या आढावा बैठकीत अजित पवारांची मोदींवर टीका

शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मावळ लोकसभा निडणुकांच्या पार्श्वभूमीवर आघाडीच्या नेत्यांसह पदाधिकार्‍यांची, आढावा बैठक राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, आमदार अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी येथील ज्येष्ठ नागरिक हॉल, ठाणा नाका रोड, पनवेल येथे पार पडली. यावेळी अजित पवार यांनी मोदी सरकारवर ताशेरे ओढत 650 कोटींच्या राफेलच्या 1 हजार 600 कोटींना केलेल्या खरेदीचा प्रकार उघड होऊ नये म्हणून राफेलची फाईल चोरीला गेली असल्याची शंका यावेळी त्यांनी उपस्थित केली.

शेतकरी कामगार पक्ष आणि शरद पवार यांचे नाते फार जुने आहे, दोन्ही बाजूंचे विचार सारखेच असल्यामुळे भाजप आणि शिवसेनेसारख्या पक्षांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली असल्याचेही अजित पवार यावेळी म्हणाले. यावेळी राष्ट्रवादीचे सरचिटणीस दीपक पाटील, माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, पनवेल विधानसभा अध्यक्ष काशीनाथ पाटील, महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, पनवेल शेकापचे पमपा चिटणीस गणेश कडू आदींसह शेकाप, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisement -

पार्थ पवारांच्या विजयासाठी शेकाप ताकद लावेल
बाळाराम पाटील यांना आमदार बनविण्यासाठी शरद पवार यांच्यासह अजित पवार यांनी विशेष परिश्रम घेतले असल्यामुळे पार्थ पवार यांच्या लोकसभा निवडणुकीत शेकापचे कार्यकर्ते जोमाने काम करून पार्थ पवार यांना खासदार बनविण्याचे कर्तव्य पार पाडतील, अशी ग्वाही यावेळी शेकापच्या वरिष्ठ आमदार बाळाराम पाटील आणि शेकापच्या पदाधिकार्‍यांनी पवार यांना दिली. पार्थ पवार यांना पनवेल उरण, कर्जत या तीन विधानसभा मतदार संघातून एक लाख मतांची आघाडी आम्ही देऊ असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -