घरमुंबईराज ठाकरेंची उद्या चौकशी होणार नाही

राज ठाकरेंची उद्या चौकशी होणार नाही

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे साडे आठ तासांनंतर बाहेर आले असून त्यांची उद्या चौकशी होणार नसून पुढील काळात गरज पडल्यास त्यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ईडी कार्यालयात हजर राहिले होते. गेल्या साडे आठ तास ईडीकडून चौकशी सुरु होती. यावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत ईडी कार्यालयात आले होते. राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला, मुलगा अमित, सून मिताली आणि मुलगी उर्वशी हे संपूर्ण ठाकरे कुटुंबिय या कठिण प्रसंगी राज यांच्या सोबत उपस्थिती होते. दरम्यान, गेल्या साडे आठ तासानंतर आता ते बाहेर आले आहेत. तसेच त्यांची उद्या ईडीकडून चौकशी होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, गरज पडल्यास पुढे त्यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, राज ठाकरे आपल्या कुटुंबासह कृष्णकुंजावर दाखल झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -