घरमुंबई‘रे रोड’देशातले फ्री वाय-फाय देणारे १००० वे स्थानक!

‘रे रोड’देशातले फ्री वाय-फाय देणारे १००० वे स्थानक!

Subscribe

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील रे रोड हे स्थानक मोफत वाय-फाय सुविधा देणारे देशातले १००० वे स्थानक ठरल्याचे ‘रेलटेल’ कंपनीने जाहीर केले आहे. भारतीय रेल्वेमध्ये १००० रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फाय स्थानकांचा टप्पा गुरुवारी पूर्ण करण्यात आला.

रेल्वे प्रवाशांकरिता मोफत वाय-फाय सुविधा अनेक रेल्वे स्थानकांवर सुरू करण्यात आले होते. मुंबई सेंट्रल स्थानकात जानेवारी २०१६ मध्ये महाराष्ट्रात सर्वप्रथम मोफत वाय-फायच्या सेवेस सुरुवात झाली होती. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील रे रोड हे स्थानक मोफत वाय-फाय सुविधा देणारे देशातले १००० वे स्थानक ठरल्याचे ‘रेलटेल’ कंपनीने जाहीर केले आहे. भारतीय रेल्वेमध्ये १००० रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फाय स्थानकांचा टप्पा गुरुवारी पूर्ण करण्यात आला.

रेल्वे स्थानकचे रुपांतर डिजिटल हबमध्ये 

मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हिजनमध्ये २३ रेल्वे स्थानकांत मोफत वाय-फायची सुविधा देण्यात आली. त्यापैकी १५ रेल्वे स्थानके मुंबई उपनगरात आहेत. आता ‘रे रोड’ हे स्थानक मध्य रेल्वेचे ही सुविधा असणारे १६ वे स्थानक ठरणार असून मुंबई डिव्हिजनच्या मोफत वाय-फाय सुविधा देणाऱ्या स्थानकांची संख्या आता २४ होणार आहे. ‘रेलटेल’ कंपनीने गुगलच्या सहाय्याने मोफत वाय-फायची सुविधा देण्यात आली असून रेल्वे स्थानके आता डिजिटल हब स्वरूपाची झाल्याचे रेलटेल कंपनीने सांगितले.

- Advertisement -

सामाजिक दायित्व निधीतून सेवा सुरू

‘रेलटेल’ कंपनीने ३८६ रेल्वे स्थानकांत वाय-फाय सुविधा स्वखर्चाने कार्यान्वित केली आहे. तर काही रेल्वे स्थानकांवर गुगलबरोबर विविध कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधी उपक्रमातून ही सेवा सुरू करण्यात आले. वाय-फाय सेवा आणि उत्कृष्ट दर्जा असल्यामुळे लाखो प्रवासी मोफत वाय-फाय सेवेचा फायदा घेत असल्याचे सध्या दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -