घरमनोरंजनतब्बल ८५ वर्ष जुनं रीगल सिनेमागृह बंद होणार

तब्बल ८५ वर्ष जुनं रीगल सिनेमागृह बंद होणार

Subscribe

गेले ८५ वर्ष मुंबईची शान असणारं रीगल सिनेमागृह लवकरच बंद होणार आहे. मुंबईतील सर्वात जुने असे हे रीगल सिनेमागृह आहे.

गेले ८५ वर्ष मुंबईची शान असणारं रीगल सिनेमागृह लवकरच बंद होणार आहे. मुंबईतील सर्वात जुने असे हे रीगल सिनेमागृह आहे. सिंगल स्क्रीन, वातानुकूलीत असलेले पहिले रीगल सिनेमागृह आता आर्थिक तोट्यामुळे बंद करावे लागत आहे. गेल्या वर्षभरात जवळपास एक कोटीहून अधिक नुकसान झाल्यामुळे सिनेमागृह बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १९३३ साली बांधण्यात आलेल्या या सिनेमागृहाची ११६० सीट इतकी जास्त आसनक्षमता आहे. दोन मजल्यांच्या या सिनेमागृहाची रचना ब्रिटीशकालीन आर्किटेक्चर चार्ल्स स्टीव्हन्स आणि कर्ल शारा यांनी केली होती.

घाट्यात चालतोय सिनेमागृह

मात्र, आता मल्टिप्लेक्सच्या युगात या सिंगल स्क्रीन सिनेमागृहाचा व्यवसाय घसरून १५ ते २० टक्क्यांवर आला आहे. मल्टिप्लेक्स थेएटर्सच्या तिकीट दराच्या तुलनेत रीगल सिनेमाचे दर अत्यंत कमी होते. दीडशे ते अडीचशे रूपये इतकेच दर चित्रपटासाठी आकारले जात होते. गेल्या वर्षभरात एक कोटीहून अधिक नुकसान रीगल सिनेमाला सहन करावं लागलं आहे. एवढं नुकसान आता भरून काढणं शक्य नसल्यामुळे हे सिनेमागृह बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

मल्टिप्लेक्सचीही चर्चा

प्रेक्षक सिंगल स्क्रीनपेक्षा सध्या मल्टिप्लेक्सला प्राधान्य देतात. त्यामुळे मध्यंतरी ८५ वर्ष जून रिगल सिनेमागृह बंद न करता त्याचे मल्टिप्लेक्समध्ये रूपांतर करावे, असा प्रस्ताव मांडण्यात आला होता. आणखी दोन स्क्रिन वाढवाव्यात, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र मल्टिप्लेक्स चालकांनी प्रतिसाद न दिल्यामुळे अखेर रिगल सिनेमागृह बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या चित्रपटांना हाऊसफुल्लची पाटी

  • द साऊंड ऑफ म्युझिक – ३८ आठवडे
  • इंटर द ड्रॅगन – ३१ आठवडे
  • टायटॅनिक – ३० आठवडे
  • गांधी – २६ आठवडे
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -