घरटेक-वेकअखेर प्रतीक्षा संपणार; जिओ गिगाफायबर आज होणार लाँच

अखेर प्रतीक्षा संपणार; जिओ गिगाफायबर आज होणार लाँच

Subscribe

१२ ऑगस्टला रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत जिओ फायबरच्या लाँचिंगची घोषणा करण्यात आली होती

गेल्या बऱ्याच महिन्यांपासून जिओ गिगाफायबरसाठी देशातील काही निवडक शहरांमध्ये याची चाचणी सुरू होती मात्र अखेर आजपासून या सेवेस प्रारंभ होणार आहे. बहुप्रतिक्षित जिओ गिगाफायबर सेवेबाबत घोषणा केली होती, ही सेवा अधिकृतपणे लाँच करण्यात येणार असल्याने अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज संपणार आहे. यामुळे माफक दरात फास्ट इंटरनेट सेवा-सुविधा युजर्स मिळणार आहे. यासंदर्भात कंपनीने मागच्या वर्षात ५ जुलैला घोषणा केली होती. यानंतर १२ ऑगस्टला रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत जिओ फायबरच्या लाँचिंगची घोषणा करण्यात आली.

असा असेल जिओ गिगाफायबरचा प्लान

आजपासून लोकांना हे प्लान्स घेता येणार असून हा जिओ गिगाफायबरचा प्लान ७०० रूपयांपासून १० हजार रूपयांपर्यंत आहे. यामध्ये जिओ गीगाफायबरचे विविध प्लॅन असणार आहेत. आवश्यकतेनुसार युजर्स प्लॅनची निवड करु शकतात. तसेच ग्राहकांना ४K सेट टॉप बॉक्स मोफत मिळणार आहे. या सेट टॉप बॉक्सच्या माध्यमातून एकावेळी चार जण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करू शकणार आहेत.

- Advertisement -

१Gbps पर्यंत स्पीड

रिलायंस जिओ आपल्या होम ब्रॉडबँड सेवेमध्ये ग्राहकांना हाय स्पीड इंटरनेट सेवा पुरवणार आहे. जिओ फायबरमध्ये युजर्सना १००Mbps ते १Gbps पर्यंत स्पीड मिळेल. जिओ ७००रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना १००Mbps आणि प्रीमियम प्लॅनमध्ये१Gbps स्पीड मिळेल. या दोन्ही प्लॅन्सच्या दरम्यान अन्य विविध प्लॅन्सचाही समावेश असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -