घरमुंबई'बाबरी पाडणारे आम्हीच आहोत'; कंगनाच्या ‘बाबर सेना’ टीकेला राऊतांचं प्रत्युत्तर

‘बाबरी पाडणारे आम्हीच आहोत’; कंगनाच्या ‘बाबर सेना’ टीकेला राऊतांचं प्रत्युत्तर

Subscribe

बाबर सेना उल्लेखावरून संजय राऊत यांनी कंगनाला सुनावलं

गेल्या काही दिवसांपासून कंगना विरुद्ध शिवसेना यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. कंगनाने राणावतने मुंबईसह मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या ट्विटवरून हा वाद चांगलाच पेटला. तर आज कंगनाच्या कार्यालयावर अनधिकृत बांधकामाच्या कारणावरून BMC ने हाताडा चालवला. यावर संतप्त झालेल्या कंगनाने वाटेल तसा शिवसेनेवर निशाणा साधला दरम्यान, तिने शिवसेनेला बाबरची सेना देखील म्हटलं. कंगनाच्या या टीकेला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी चोख प्रत्युत्तर दिल्याचे दिसतेय.

कारवाईमागे कोणतीही बदल्याची भावना नाही

इंडिया टुडे वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत यांनी कंगनाच्या टीकेला उत्तर दिले. यावेळी राऊत असे म्हणाले, ”बाबरी तोडणारे लोक आम्हीच आहोत. मग आम्हाला काय म्हणत आहे. कंगना रणौतशी माझं वैर नाही. ती एक कलाकार आहे. मुंबईत राहते. पण ज्या प्रकारची भाषा तिने मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांबद्दल वापरली आहे. ती सहन करण्यासारखी नाही. कंगनाने जर आपले म्हणणे मागे घेतले, तर वाद राहणारच नाही” तसेच महापालिकेने केलेली कारवाईचे प्रकरण आता उच्च न्यायालयाकडे आहे. त्यामुळे महापालिका न्यायालयात उत्तर देईल. ही कारवाईमागे कोणतीही बदल्याची भावना नसल्याचेही यावेळी राऊतांनी म्हटले आहे.

- Advertisement -

कारवाईचं उत्तर फक्त महापालिका आयुक्तांकडेच..

यासह संजय राऊत असेही म्हणाले, ”झालेल्या कारवाईचं उत्तर फक्त महापालिका आयुक्तच देऊ शकतात. जर कुणी कायदा तोडत असेल, त्याच्यावर कारवाई केली जाते. अशावेळी पक्षाकडे माहिती असावी हे गरजेचं नाही. शरद पवार यांनी काय म्हटलं आहे, याबद्दल मला माहिती नाहीये. माझ्यासाठी अभिनेत्रीसोबतचा वाद संपला आहे. विधानसभेत कंगना रणौतविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्यात आला आहे. गृहमंत्र्यांनीही याविषयी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे कायदा काम करत असताना माझं बोलणं बरोबर नाही.”


कंगनाच्या बंगल्यावर हातोडा, कंगनाने दिली ‘बाबर’,’पाकिस्तानची’ उपमा!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -