राज्य पोलीस दलातील २८ IPS अधिकार्‍यांच्या बदल्या!

राज्यातल्या एकूण २८ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून राज्य सरकारने शासकीय आदेश काढून या बदल्या जाहीर केल्या आहेत.

Mumbai
IPS
आयपीएस

लोकसभा निवडणुका शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपलेल्या असतानाच राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राज्यातल्या तब्बल २८ उच्चपदस्थ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढती करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्त देवेन भारती यांना दहशतवाद विरोधी पथकाचे अप्पर पोलीस महासंचालक पदावर, तर सहपोलीस आयुक्त (गुन्हे) आशुतोष डुंबरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी बढती देण्यात आली आहे. प्रशासन विभागाचे संतोष रस्तोगी यांची गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त म्हणून तर अतुलचंद्र कुलकर्णी यांची राज्य गुन्हे विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी बदली करण्यात आली आहे. एकूण २८ अधिकाऱ्यांमध्ये ९ डीसीपी (पोलीस उपायुक्त), ९ एडीजीपी (अप्पर पोलीस महासंचालक) आणि १० डीआयजी (विशेष पोलीस महानिरीक्षक) पदावरच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

बदली झालेले आयपीएस अधिकारी

 • फोर्स वनचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुखविंदर सिंह – फोर्स वनच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी
 • प्रशासन विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक अनुपकुमार सिंह – अप्पर पोलीस महासंचालक व मुख्य दक्षता अधिकारीपदी
 • विशेष पोलीस महानिरीक्षक विनीत अग्रवाल – राज्य सुरक्षा महामंडळाच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी
 • महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल रामानंद – पुण्याच्या सुधार सेवा, अप्पर पोलीस महासंचालकपदी
 • प्रशासन विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे – अप्पर पोलीस महासंचालक व व्यवस्थापकीय संचालकपदी
 • दहशतवाद विरोधी पथकाचे अप्पर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी – पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी
 • संजीव सिंघल – अप्पर पोलीस महासंचालक, प्रशासन विभागापदी
 • महिला अत्याचार प्रतिबंध कक्षाचे पोलीस उपमहानिरीक्षक प्रताप दिघावकर – महिला अत्याचार प्रतिबंध विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी
 • पोलीस उपमहानिरीक्षक व मुख्य दक्षता अधिकारी मनोज लोहिया – विशेष पोलीस महानिरीक्षक आणि मुख्य दक्षता अधिकारीपदी
 • गुन्हे शाखेचे पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय यादव – विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्हे शाखापदी
 • ठाण्याचे अप्पर पोलीस आयुक्त केशव पाटील – विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशिक्षण-प्रशिक्षण संचालनालयपदी
 • पुण्याचे अप्पर पोलीस आयुक्त पी. व्ही देशपांडे – संचालक, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी-पुणेपदी
 • व्हीआयपी विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश – विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशासनपदी
 • विशेष पोलीस महानिरीक्षक राजवर्धन – आर्थिक गुन्हे शाखेच्या सहपोलीस आयुक्त
 • वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त अमितेशकुमार – सहपोलीस आयुक्त, गुप्तवार्ता-राज्य गुप्तवार्ता विभागपदी
 • महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व विशेष पोलीस महानिरीक्षक दीपक पांडे – विशेष पोलीस महानिरीक्षक सुधार सेवा-महाराष्ट्र राज्यपदी
 • नागपूर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निलेश आनंद भरणे – नागपूर शहराच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी
 • दक्षताचे मुख्य संपादक आणि सहाय्यक पोलीस महानिरीक्षक एम. आर घुर्ये – पोलीस उपमहानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस दल-नागपूरपदी
 • संजय शिंदे – पुणे शहराच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी
 • पुणे गुन्हे शाखेचे पोलीस अधिक्षक आर. बी. डहाळे – पुणे बिनतारी संदेश यंत्रणेच्या पोलीस उपमहानिरीक्षकपदी
 • पुणे राज्य राखीव दलाचे पोलीस अधिक्षक ए. आर मोराळे – पुणे शहर अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी
 • राज्य गुप्तवार्ता विभागाचे पोलीस उपायुक्त निसार तांबोळी – पोलीस उपमहानिरीक्षक आणि मुख्य दक्षता अधिकारीपदी
 • नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीचे पोलीस अधिक्षक जालिंदर दत्तात्रय सुपेकर – पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपमहानिरीक्षकपदी
 • डॉ. जय वसंतराव जाधव – संचालक-पोलीस उपमहानिरीक्षक-महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळपदी
 • महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे पोलीस उपमहानिरीक्षक एम. के. भोसले – औरंगाबादच्या सुधार सेवेच्या पोलीस उपमहानिरीक्षकपदी नियुक्तीपदी

हेही वाचा – मुंबईतील ७ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या