घरमुंबईसंजय राऊत यांचे नवे ट्विट; भाजपवर पुन्हा हल्लाबोल

संजय राऊत यांचे नवे ट्विट; भाजपवर पुन्हा हल्लाबोल

Subscribe

संजय राऊत यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करत विरोधी बाकांवर बसलेल्या भाजपाला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ट्विटरवरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्याला लाभला असून आता भाजप विरोधी बाकांवर बसली असली तरीही संजय राऊत यांनी शब्दांचा मारा भाजपवर सुरुच ठेवला आहे. सोमवारी सकाळी त्यांनी आणखी एक ट्विट करत विरोधकांना शांत राहण्याचा सल्ला दिला. संजय राऊत यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करत विरोधी बाकांवर बसलेल्या भाजपाला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.

- Advertisement -

भाजपासोबत मुख्यमंत्रीपदाच्या वाटपावरुन झालेल्या वादानंतर संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. शिवसेनेची बाजू आक्रमकपणे मांडण्यात शिवसेनेकडून संजय राऊत यांनी मोठी भूमिका निभावली. इतकंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत समन्वय साधण्याची जबाबदारीही त्यांनी पार पाडली. महाविकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन होण्यामध्ये शिवसेनेच्या बाजूने संजय राऊत यांचा मोलाचा वाटा आहे.

हेही वाचा –

८० तासांचे मुख्यमंत्री; सामनातून देवेंद्र फडणवीसांवर टिकास्त्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -