घरमुंबईमुंबई - गोवा महामार्गावर शिवशाहीचा अपघात

मुंबई – गोवा महामार्गावर शिवशाहीचा अपघात

Subscribe

मुंबई - गोवा महामार्गावर शिवशाहीला झालेल्या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सामान्य प्रवाशांना सुखकर, वातानुकुलित आणि आरामदायी प्रवास करता यावा यासाठी एस.टी. महामंडळाने अत्याधुनिक अशी शिवशाहीची बस आणली. मात्र या अत्याधुनिक अशा शिवशाही बसेस अपघाताच्या दृष्टचक्रात सापडल्या असल्याचे समोर आले आहे. नुकतेच ठाणे विभागातील शिवशाही बसचे वर्षभरात २६ अपघात झाले असल्याची माहिती समोर आली असून पुन्हा एकदा शिवशाही बसचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. मुंबई – गोवा महामार्गावर शिवशाही बसचा गुरुवारी सकाळी अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत.

नेमका अपघात कसा झाला

मुंबई – गोवा महामार्गावर आज सकाळी साडे अकराच्या सुमारास शिवशाही बसला अपघात झाला. दापोलीवरुन शिवशाही बस मुंबईला निघाली होती. बस मुंबई – गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील गडब गावाजवळ पोहोचली. त्यादरम्यान समोरुन येणाऱ्या मिनी डोअर रिक्षा आणि बसची धडक झाली. या अपघातानंतर बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटली. या अपघातात बसमधील चार तर रिक्षेतील दोन प्रवासी जखमी झाले आहेत. या जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

यामुळे होतात शिवशाहीचे अपघात?

वातानुकूलित शिवशाही बस ताफ्यात दाखल झाल्यानंतर त्यांना सेवेपेक्षा ही बस अपघात, चांगली वागणूक, बेदरकारपणे वाहन चालविणे यामुळे शिवशाही बस नेहमीच चर्चेत असते. शिवशाही वाहनांची लांबी, उंची, वजन, वाहनांची समोरील बाजू जास्त असून वाहनाच्या बॉडीचे जमिनीपासूनचे अंतर कमी आहे. या बदलामुळे महामंडळाच्या चालकांना बस चालविताना अनेक समस्यांना सामना करावा लागतो. त्यामुळे या शिवशाही बसचे अपघाीत वाढण्याची शक्यता आहे.


वाचा – शिवशाही बसला वर्षभरात २६ अपघात

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -