घरमुंबईसहा बोगस डॉक्टरांना अटक

सहा बोगस डॉक्टरांना अटक

Subscribe

पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण; स्वत:चे क्लिनिक

गोवंडी परिसरातून सहा बोगस डॉक्टरांना मंगळवारी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. मुकूल अमर किसनादास, मकसूद अहमद मोहम्मद रिझवान अन्सारी, किस्मतअली सलाह शहा, तय्यबअली अब्दुल्ला चौधरी, मुक्तारअली बरकतअली शाह आणि कमरुद्दीन अब्दुल अहमद मारुफी अशी या सहाजणांची नावे आहेत. विशेष म्हणजे या सहाजणांचे शिक्षण पाचवी ते बारावीपर्यंत झाले असून त्यांनी स्वतचे क्लिनिक उघडून तिथे येणार्‍या रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरु केला होता.

अटकेनंतर या सर्वांना शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. कुठलीही वैद्यकीय पदवी नसताना संबंधित बोगस डॉक्टर मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी परिसरात क्लिनिक थाटून सर्वसामान्यांचा अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांच्याकडून मोठी फी आकारत होते. तसेच त्यांना बोगस औषध देऊन त्यांच्या जिवाशी खेळ करीत होते, त्यामुळे अशा बोगस डॉक्टरांविरुद्ध काही महिन्यांपासून मुंबई पोलिसांनी एक विशेष मोहीम सुरु केली होती. ही मोहीम सुरु असतानाच गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात काही बोगस डॉक्टर कार्यरत असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या पथकातील युनिट सहाच्या अधिकार्‍यांनी एम-पूर्व विभागाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांच्या मदतीने शिवाजीनगर परिसरातील सहा वेगवेगळ्या खाजगी क्लिनिकमध्ये छापा टाकून ही कारवाई केली.

- Advertisement -

या कारवाईत मुकूल किसनादास (अकरावीपर्यंत शिक्षण), मकसूद अन्सारी (पाचवी), किस्मत शहा (आठवी), तय्यबअली चौधरी (सहावी), मुक्तारअली शाह (पाचवी), कमरुद्दीन मारुफी (बारावी) या सहाजणांना अटक केली. या सहाजणांकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नव्हती. तरीही ते क्लिनिक उघडून रुग्णांना औषध देऊन त्यांच्याकडून मोठी फी घेत होते. त्यांच्याविरुद्ध भादवीसह महाराष्ट्र मेडीकल प्रॅक्टिशनर्स कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यांना पुढील चौकशीसाठी शिवाजीनगर पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. अटकेनंतर या सर्वांना बुधवारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -